पोलिस प्रशासन

हनीट्रॕप !अनोळखीला व्हिडिओ काॕल करताना सावधान- अप्पर पोलिस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी(व्हिडिओ)

जळगाव दि-5 हल्लीच्या आधुनिक काळात वेगवान इंटरनेटच्या सहकार्याने सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असून याचा काहीजण चांगल्या कामासाठी तर काहीजण वाईट कामासाठी वापर करतांना दिसून येत आहे.शहरासह ग्रामीण भागातील तरूण-तरूणी फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइटवर दररोज चॕटींग करणे,व्हिडिओ पाहणे,संदेशांची देवाणघेवाण करणे यात गुंतलेले असतात.या सोशल मीडिया साईट वापरत असताना अनेक जण काही वेळा सहसा एकातांतच असतात.

अशावेळी सर्वाधिक वापरले जाणारे फेसबुक, व्हाॕट्सॲप आणि इंस्टाग्राम या सोशल मिडिया साईटच्या माध्यमातून तरुणांना विविध आमिषे दाखवून हनीट्रॕप मध्ये अडकवले जाते किंवा सेक्सटाॕर्शनला पराववृत्त केले जाते.तसेच विशिष्ट ॲप डाऊनलोड करायला लावून तर कधी फेसबुक, व्हाॕटसॲपवर अनोळखी क्रमांकावरून आलेली लिंक किंवा ओटीपीच्या माध्यमातून बँकिंग तथा आॕनलाईन फ्राॕड करणे तसेच ब्लॕकमेलिंगचे प्रकार करण्यात येत आहेत. तरुणांची या माध्यमातून ब्लॕकमेलिंग होत असल्यास काही जण गुपचूपपणे काही पैसे देऊन प्रकरण दाबून घेतात तर काही जण तणावामुळे प्रसंगी कोणत्याही थराला जाऊन आत्महत्येसारखे वाईट कृत्य करतात.तरी असे वाईट कृत्य न करता आपल्याला ब्लॕकमेलिंग केले जात असल्यास जळगाव सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करून मदत घेऊन तक्रार करावी.

हल्ली वाढत्या हनीट्रॕप किंवा सेक्सटाॕर्शनच्या विळख्यात तरूण अडकत असून याबाबत भावनेच्या आहारी न जाता तरूणांनी अनोळखी महिलेशी न्युड व्हिडिओ काॕल करू नये, सावधानता बाळगावी, असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी आज “मिडियामेल न्युज” च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तरुणांना केलेले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.