Crimeकोर्ट निकाल

हैदराबाद एन्काऊंटर बनावट – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय,10 पोलीस दोषी | Hyderabad Encounter Result

नवीदिल्ली – दि 6 डिसेंबर 2019 च्या कथित हैदराबाद चकमक हत्याकांडाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या आयोगाला असे आढळून आले आहे की, महिला डॉक्टरच्या सामुहिक बलात्कार व हत्येच्या प्रकरणातील संशयितांचा मृत्यू पोलिस दलाने झाडलेल्या गोळ्यांमुळे झालेल्या जखमांमुळे झाला आणि पोलिस दलाने गोळीबार केला नाही, असा पोलिसांचा दावा पुराव्याअभावी फेटाळून लावत, संबंधित सामग्री व पुराव्यांच्या आधारे असा निष्कर्ष काढलेला आहे की ,चार आरोपींना “त्यांच्या मृत्यूच्या उद्देशाने पोलिसांनी जाणूनबुजून गोळीबार केला.
काय आहे आयोगाच्या चौकशीत ?
पोलिस रेकॉर्डवरील संपूर्ण सामग्री व पुराव्यांचा विचार केल्यावर,आयोगाने असा निष्कर्ष काढला की मृत व्यक्तींनी दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेणे, कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणे, पोलिस पक्षावर गोळीबार करणे यासारखे कोणतेही गुन्हे केलेले नाहीत.त्यामुळे आयोगाने म्हटले आहे की या प्रकरणातील संशयितांना त्यांच्या घरून पकडून आणून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या पोलिसांची होती.मात्र यात सर्व 10 पोलिस या संशयितांना ठार मारण्याच्या समान हेतूने त्या प्रत्येकाने केलेली वेगवेगळी कृत्ये दिसून येत आहे. या सर्व 10 पोलिस अधिकाऱ्यांवर हत्या आणि समान हेतू (कलम 302 r/w 34 IPC, 201 r/w 302 IPC आणि 34 IPC अन्वये गुन्हे) पूर्ततेसाठी पुरावे नष्ट करण्याचा खटला चालवला जाण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.