क्राईमराजकीय

ॲड.रोहिणी खडसेंच्या गाडीवर प्राणघातक हल्ला, जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

जळगाव – जिल्ह्यात खासकरून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या अवैध धंद्यापासून इतर अनेक विषयांवर आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ठिणगी पडलेली असून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आज जळगाव जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहीणीताई खडसे खेवलकर या चांगदेव येथुन हळदीनिमित्त कार्यक्रम आटोपुन रात्री 8.30  वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी गाडीच्या काचांवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडालेली आहे. ॲड रोहिणी खडसे या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे काही गेल्या दिवसांपासून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीशी या दगडफेकीच्या घटनेची किनार असण्याची शक्यता आहे का ? या दृष्टीने पोलिस यंत्रणा  आता कामाला लागलेली आहे. या घटनेवर खडसे परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देतो ? याकडे राज्याचे लक्ष लागून आहेत. याबाबत सविस्तर वृत्त लवकरच …….

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.