ॲड. रोहिणी खडसेंवर हल्ला करणाऱ्यांचा तात्काळ शोध घ्यावा- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पोलिसांना आदेश
शिवसेना- राष्ट्रवादी संघर्ष चिघळण्याची शक्यता

मुंबई- जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या चारचाकी गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या भ्याड हल्ल्याचा जोरदार निषेध केला असून , एक महिला सक्षमपणे आपल्या मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो तसेच जळगाव पोलिस अधीक्षकांनी देखील तातडीने या हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी @JalgaonPolice pic.twitter.com/IuHHp86RBw
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 27, 2021