ॲड.रोहिणी खडसे हल्ला प्रकरणः मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई- जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या चारचाकी गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खडसे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली असून त्यांनी म्हटलेलं आहे की, आमचा मुक्ताईनगर मतदारसंघ हा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी तलाठीपासून तर अनेक नामवंत महिला राजकीय तसेच विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आज ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी तीव्र निषेध केलेला असून, एक महिला सक्षमपणे आपल्या मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये , तसेच हल्ल्याची उच्चस्तरीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी ,अशी मागणी विधानसभेत करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.