क्राईम

सावदा येथे वादातून एकाची निर्घृण हत्या

दि 20 आँगस्ट २०२०.
येथील शहरात खाजानगर भागात जुन्यावादाचा वचपा ठेऊन तिन जणांनी एकाला लोखंडी पाईपाने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत जखमी व्यक्ती रक्तबंबाळ झाल्याने जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी 5-30 वाजे दरम्यान प्रथमच घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे एपीआय राहुल वाघ , पीएसआय राजेंद्र पवार, पोलीस कर्मचारी उपस्थितीत गुन्ह्य़ाची नोंद करण्यात येत आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, येथील खाजानगर भागात न पा च्या जागेवर एका झोपडीत राहणारा रईस डंगा वय 50. मुळगाव लालबाग मध्य प्रदेश याचेवर येथील तिन जणांनी यानेच आमचे नाव मोबाईल चोरी संदर्भात भुसावळ पोलीसांना सांगितले असा संशय घेऊन आज त्यांचा वसपा काठण्याचे हेतूने त्याचेवर जम जम किराणा दुकानासमोर राजुशहा दाऊद शहा. शाहरूख खान. अजहर खान यांनी लोखंडी पाईपाने मारहाण केली. यात रईस डंगा हा गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झालेने डोळ्यातून रक्तस्राव झाल्यामुळे तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.आरोपींनी मारहाणीतील पाईप तेथेच गार्यात टाकून पळ काढला आहे.
गावात खुन झाल्याची एकच वार्ता शहरात पसरल्याने खळबळ उडाल्याने वार्ता पोलीसांपर्यत पोहचताच पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल वाघ पीएसआय राजेंद्र पवार पोलीसांसह घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. यावेळी पोलिसांनी पंचनामा करण्याचे सुरू होते. दरम्यान पोलीस उपअधिक्षक नवटक्के, डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन पुढील तपास करण्याचे सुचविले. त्यावरून पुढिल तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोपींना लवकरच अटक करण्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस लगेच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.