10 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुंबईतील डीसीपी सौरभ त्रिपाठी निलंबित

मुंबई दि-22 अंगडिया नामक तक्रारदाराकडून 10 कोटींची कथीत खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई येथील पोलिस उपायुक्त पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते बेपत्ता होते. दिनांक 16 मार्च रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना फरार घोषित केले होते. DCP यांना फरार घोषित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती गृह मंत्रालयाला दिलेली होती. तसेच सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात याप्रकरणी कोणकोणते पुरावे सापडले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई का करण्यात यावी ? याचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांनी तक्रारदार यांना फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली आहे.याबाबतचे काही ऑडिओ क्लिप पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागलेले आहे.
दरम्यान,अंगडिया कडून 10 कोटींची खंडणी वसुली प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत चार जणांवर गुन्हा दाखल करून तीन पोलिस अधिका-यांना अटक केलेली आहे.यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे आणि पोलिस निरीक्षक कोण वंगाटे यांना पोलिसांनी अटक केली आहे.यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे.