क्राईम

10 हजारांची लाच घेताना PSI व पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला 10 हजारांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ अटक केलेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नव्याने रूजू झालेले नुतन पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांची हि पहिलीच धडाकेबाज कारवाई आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डंपरमालक असलेले तक्रारदार पुरुष रा.साकेगाव ता.भुसावळ यांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी, वय-56 रा.भिरूड कॉलनी,भुसावळ याला तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर क्रमांक MH-40 N4086 हे असून सदरील डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करताना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष 10 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार पो.कॉ.गणेश महादेव शेळके, वय-31, रा.पोलीस वसाहत, वरणगाव ता.भुसावळ यांनी 10 हजारांची लाच स्वीकारली. लागलीच
या दोघांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केलेली आहे.
सदरील कारवाई ही अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक श्री सतीश डी.भामरे,पो.नि.संजोग बच्छाव, पो.नि लोधी,स.फौ.दिनेशसिंग पाटील,व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून केलेली आहे.या कारवाईने जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.