शासन निर्णय

100 कोटींच्या कथीत वसुली प्रकरणी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार

मुंबई- माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथीत 100 कोटींच्या वसुलीचा सनसनाटी आरोप करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली होती. या आरोपांमुळे राज्यासह देशभर मोठी खळबळ उडालेली होती. आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय एकल सदस्य समिती नेमलेली आहे. या समितीत उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांडीवाले हे या प्रकरणी चौकशी करतील. तसेच ही समिती 6 महिन्यांत आपला अहवाल सादर करेल अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आलेली आहे.

source- All India Redio

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.