कोर्ट निकालमुंबईराजकीय

16 बंडखोर आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसांविरोधात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

16 बंडखोर आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसांविरोधात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी कथित पक्षांतर केल्याप्रकरणी 16 बंडखोर आमदारांना महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीला आव्हान देणारी रिट दाखल केल्याने महाराष्ट्रातील राजकीय सत्तसंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला आहे.तसेच आता ही न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शिंदे यांची याचिका, आज (26 जून) संध्याकाळी 6.30 वाजता दाखल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला आव्हान दिलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती पद रिक्त असल्याने उपसभापतींनी अपात्रतेची नोटीस बजावलेली आहे.
उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचा (SSLP) गटनेता म्हणून मान्यता देणे बेकायदेशीर असल्याचे याचिकेत म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या 2/3 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे एकनाथ शिंदे उपसभापतींच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावर निर्णय होईपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिसांवरची कार्यवाही थांबवावी अशी मागणी केलेली आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला पक्षांतरविरोधी कायद्यातील चौथ्या सूचीतील “विभाजन” आणि “विलगीकरण” यातील फरक लक्षात न आल्याने त्यांच्यात गोंधळ जडून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाला आता सत्तास्थापनेसाठी कायदेशीर व घटनात्मक तरतुदींनुसार पाऊल टाकणे आवश्यक झालेलं असल्याचे घटना तत्ज्ञांच मत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.