जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

रक्षा खडसेंना निवडणुकीत पाडणारच ! कारण त्यांच्यामुळेच ‘आई’चा पराभव झाला होता,रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम

जळगाव दिनांक 22 मार्च, रावेर लोकसभेसाठी भाजपतर्फे सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून भाजपच्या नेत्यांनी खडसेंना चक्रव्यूहात अडकवून त्यांची राजकीय कोंडी केल्याच्या चर्चा अधून मधून सुरूच आहेत. त्यातही गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असा दावा एकनाथराव खडसेंनी केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी तब्येतीचे कारण पुढे करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते तसेच त्यांची कन्या यांनीही लोकसभा लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी एकनाथराव खडसेंनी रावेरची लोकसभेची जागा ही दिल्लीत मॅनेज केल्याचे जाहीर खळबळजनक वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर केलेले होते. यावर स्पष्टीकरण देताना एकनाथराव खडसेंनी सतीश पाटील यांनी ते वक्तव्य गैरसमजुकीतून केलं असावा असा दावा केला होता. मात्र आज रक्षा खडसे यांच्या नणंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करणार असून भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंना निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही असा दावा केलेला आहे. रोहिणी खडसे यांनी असा दावा टीव्ही नाईन मराठी या मराठी वृत्तवाहिनी कडे केलेला त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की रक्षा खडसे यांनी अनेकदा खडसे कुटुंबावर बेछूट आरोप होत असताना त्या विरोधात कोणतेही भाष्य केलेले नाही, तसेच जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आई मंदाताई खडसे यांना निवडून येण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. मात्र विरोधकांना त्यांनी मदत केली म्हणून मंदाकिनी खडसे यांचा दारूण पराभव झाला असा दावा रोहिणी खडसे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नणंद भावजय यांचा सुप्त राजकीय संघर्ष सुरू आहे का ? असा कयास लावला जात आहे. दरम्यान अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे रावेर लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी त्यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केलेला आहे.मात्र कालच मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून ठराव करण्यात आला होता, आणि त्याबाबत मुंबईत जाऊन शरद पवार साहेबांची भेट राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या सर्व घडामोडींकडे आता जळगाव जिल्हा लोकसभेतील राजकीय नेत्यांचे बारीक लक्ष लागून आहे. एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व त्यांचे समर्थक अजूनही उमेदवार कोण राहणार ?अशा संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button