महाराष्ट्रमुंबईराजकीय

येत्या पंधरवड्यात शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात 8 मंत्रीपदे तर, 8 महामंडळांची अध्यक्षपदे ?

इच्छुक आमदारांना लवकरच मंत्रीपदाची लॉटरी

मुंबई दि:26 उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासह शिंदे-भाजप युतीतील सरकारमध्ये सामिल झालेले आहे. त्यानंतर राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले. तर राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली.
        अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मंत्री पदांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणि भाजपमधील अनेक आमदार नाराज झाले. त्यानंतर आता शिंदे गटासह भाजपमधील या नाराज नेत्यांना आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा होती. त्याला आता मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे.
शरद पवारांच्या गटातील आमदारांना मंत्रीपदे ?

येत्या पंधरवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्याकडून नवी खेळी खेळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्याकडून सध्या शरद पवार गटातील नेत्याचे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे शरद पवार गटात सध्या 16 आमदार आहेत. किंवा जे तटस्थ आहेत त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून केले जात आहेत. यादरम्यान शरद पवार गटातील काही आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिली जाण्याची शक्यता आहे. तर काही महामंडळांवर देखील अध्यक्षपदी नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र आता या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांच्यासह इतर आमदारांना आणि भाजपातील इतर इच्छूक आमदारांना देखील येत्या 15 दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात
संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8 मंत्रीपदे तर 8 महामंडळाच्या नियुक्त्या होणार ?
   एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्या पासून म्हणजे गेल्या वर्षभरापासून आतापर्यंतच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर विविध महामंडळाच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या विविध कारणांमुळे रखडलेल्या आहेत.आता तिन्ही पक्षांच्या मंत्रीपदांसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 8 मंत्रिपदे तर काही आमदारांना 8 महत्वाच्या महामंडळांची रिक्त असलेली आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली अध्यक्षपदे देऊन खुश करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button