महाराष्ट्रमुंबईराजकीय

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, माजी कॅबिनेट मंत्री आपल्या माजी आमदार पुत्रासह शिंदे गटात जाणार !

नाशिक जिल्ह्यात उद्धव सेनेला मोठा हादरा

मुंबई,दिनांक:६ एप्रिल, गेल्या अडीच वर्षापासून अनेक मोठमोठ्या राजकीय भूकंपांचे धक्के बसलेल्या उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा जबरदस्त धक्का आज बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला आहे. नाशिकमधील दिग्गज आणि ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप हे त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप आणि शेकडो कार्यकर्त्यांसह आज ६ एप्रिल रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बबनराव घोलप हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत.त्यांचे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. बबनराव घोलप यांचा नाशिक जिल्ह्यात शिवसेनेत मोठा समर्थक वर्ग असून यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा मानला जात आहे.
बबनराव घोलप हे आतापर्यंत पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. 1990 ते 2014 दरम्यान नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदार संघातून ते सलग पाच टर्म निवडून आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली युती सरकारच्या काळात त्यांना समाज कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री बनवलेले होते. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिर्डीतून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप हे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड नाराज होते. यामुळे आज ते एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बबनराव घोलप यांचा आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे.
माजी आमदार योगेश घोलप नॉट रिचेबल
माजी कॅबिनेट मंत्री राहिलेले बबनराव घोलप हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असताना त्यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप हे मात्र नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलेली आहे ते आपले वडील बबनराव घोलप यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार की नाही याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे.आज संध्याकाळी या सर्व राजकीय घडामोडींवर खुलासा होणार आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button