विश्वविक्रम
24 तास लावणी नृत्याचा 9वी च्या विद्यार्थीनीचा विक्रम

लातूर – येथील दयानंद सभागृहात सृष्टी सुधीर जगताप या विद्यार्थीनीने 26 जानेवारी रोजी सलग 24 तास लावणीनृत्य सादर करण्याचा शुभारंभ केला होता. आज सायंकाळी तिने सलग 24 तास लावणीनृत्य सादर करून 24 तास लावणी सादर करण्याचा आशिया बुक्स आॕफ रेकाॕर्डमध्ये लावणी नृत्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सृष्टी ही पोतदार इंग्लीश स्कुलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत आहे.

यापूर्वी तिने विविध कार्यक्रमांमधून सुमारे 71 पारितोषिके पटकावलेली आहेत.तसेच एकपात्री प्रयोग सुद्धा अनेकदा सृष्टीने सादर केलेले आहेत. यापूर्वी तिने सलग 12 तास नृत्य सादर केलेले होते. मात्र आता सलग 24 तास लावणी सादर करण्याचा विक्रम करून सृष्टीने स्वतःचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे.