आरोग्य

26 मार्चला शेतकरी संघटनांची भारत बंदची हाक,अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा

नवी दिल्ली दि-25 : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच उद्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिलेली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या या भारत बंदला यापूर्वीच जाहीर पाठिंबा दर्शविलेला आहे.

शेतकरी संघटनांच्या शिष्ठमंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, “दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी संघर्षाला उद्या 26 मार्च रोजी 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंद होणार आहे.” संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, बार असोसीएशन, अनेक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारे यांच्या प्रतिनिधींनी या बंदला जाहीर पाठिंबा दर्शविलेला आहे.

काय बंद आणि काय सुरु ?
या किसान मोर्चाने सांगितलेले आहे की, पूर्ण भारत बंद अंतर्गत सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठा आणि संस्था बंद ठेवल्या जातील. सर्व छोटे-मोठे रस्ते आणि गाड्या रोखण्यात येतील. रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील.
शेतकरी नेते दर्शन पालसिंग म्हणाले की ज्या दिल्लीत धरणे आंदोलन सुरू आहे अशा सीमा आधीच बंद आहेत. यावेळी पर्यायी मार्ग उघडण्यात आले. उद्याच्या भारत बंददरम्यान हे पर्यायी मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वांनी शांत राहून या बंदला यशस्वी करण्याचे आवाहन किसान मोर्चाने केले आहे. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर वादात न पडण्याचा सल्ला सर्वांना देण्यात आलेला आहे.
काँग्रेसचे समर्थन
शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,यांचेसह अनेक पक्षांनी खुला पाठिंबा दर्शविलेला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलेले आहे की, सध्याची शेतकरी चळवळ हा याच दुव्याचा भाग आहे. तीनशे शेतकरी बांधव शहीद होऊनही झोपलेल्या मोदी सरकारला उठवण्याची वेळ आली आहे. 26 मार्चला प्रस्तावित शांततापूर्ण आणि गांधीवादी मार्गाने भारत बंदला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.