Crime

6 कोटींचा वाटाहिस्सा भोवला, 3 अधिकाऱ्यांसह 7 पोलिस निलंबित

ठाणे दि-11 काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा0 येथील बॉम्बे कॉलनी येथील फैजल मेमन या व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 30 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. या रकमेपैकी ६ कोटी रुपये उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर काढून घेत संबंधित व्यापाऱ्याला क्लीनचिट दिली होती. याबाबत काही दिवसांनी एक कथीत पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.अखेरीस याबाबत बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, उपनिरीक्षक रवी मदने आणि हर्षल काळे तसेच कॉन्स्टेबल पंकज गायकर, जगदीश गावित, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन आणि नीलेश साळुंखे अशा 10 जणांना निलंबित केलेलं आहे. तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

नक्की काय होते प्रकरण ?

या कथीत 30 कोटींच्या झोल प्रकरणी शेख इब्राहिम पाशा नामक एका अज्ञात तक्रारदाराने ठाणे पोलीस आयुक्त जयजीतसिंग तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, व पोलिस महासंचालकांसह इतर वरीष्ठांना 25 एप्रिल रोजी एका कथीत पत्र पाठवले होते. या पत्रात नमुद केल्यानुसार, दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी रात्री 12 ते 12.30 च्यादरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे भूमी निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक रवि मदने आणि आणखी तीन खासगी व्यक्ती पोलीस गाडीने मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेले. पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये मेमन यांच्या घरात तीस कोटी रुपयांची रोकड सापडली. प्रत्येकी एक कोटीप्रमाणे 30 बॉक्समध्ये हे तीस कोटी रुपये बांधून ठेवण्यात आले होते. एवढी मोठी रोकड घरात सापडल्यामुळे हा काळा पैसा असून तुझ्यावर धाड पडेल आणि सर्व पैसा जप्त होईल, अशी भीती उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी मेमन यांना दाखवली. त्यानंतर हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये 30 कोटींचे हे 30 बॉक्स ठेवण्यात आले होते. तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर मात्र पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांच्या दबावाला घाबरल्याने मेमन 2 कोटी रुपये देण्यास तयार झाले. यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी आम्ही 2 कोटी यातून काढून घेतो आणि उरलेले तुला परत करतो, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात 30 कोटींमधून 2 कोटींऐवजी त्यामधून 6 कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले 24 कोटी रुपये मेमन यांना परत केल्याच म्हटलेलं आहे. एवढे जादा पैसे का घेतले, असे मेमन यांनी पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस अधिकार्‍यांनी लाथा मारून त्यांना बाहेर काढले, असे देखील या व्हायरल पत्रात म्हटले होते.

कोण आहे हा फैजल मेमन ?
मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी येथील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी असून बांधकाम व्यावसायिकही असल्याचे सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या घरी टाकलेल्या धाडीत पोलिसांना आढळलेल्या 30 कोटींपैकी 20 कोटी रुपये त्यांना चेकने आले होते. उर्वरित 10 कोटी अन्य मार्गाने आले होते, असेही सांगण्यात येते.
नोटा असली की नकली ?
तब्बल तीस कोटी रुपयांची एवढी मोठी रोकड घरात सापडल्यानंतर याबाबत अनेक तर्कवितर्क व प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच कारवाई केल्यानंतर ही रक्कम नेमकी कुठे. गेली ? ही बाबही समोर येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी डिसीपी झोन 1 चे उपायुक्त करतील,मात्र गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त जयजीतसिंग यांनी दिलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.