Crime
6 वर्षीय बालिकेवर चुलत भावाचा अत्याचार


ऐन जागतिक आदिवासी दिनाच्या पुर्व संध्येला नात्याला काळामा फासणारी घडली आहे. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी वस्तीवर ६ वर्षीय सख्या चुलत बहिणीवर भावाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली असुन या प्रकरणी यावल पोलिसात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. संशयीताचा शोध घेण्यास पोलिसांचे पथक रवाना झाले असुन त्या चिमुरडीला उपचार्थ जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
सातपुड्याच्या कुशीतील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर पाच आदिवासी भावांचे मोठे कुटुंबीय राहते त्यातील एका भाऊचा मुलगा रोहनसिंग बिलरसिंग पावरा वय २२ याने शनीवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या सख्या काकाच्या ६ वर्षीय चिमुरडीस पाड्या लगत असलेल्या केळीच्या शेतात केळी खाऊ घालतो असे सांगुन घेवुन गेला. दारूच्या नशेत असलेल्या या नराधमाने केळीच्या बागेत या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला व तिथून पळ काढला रक्तबंबाळ व घाबरलेल्या अवस्थेत या चिमुरडीने घर गाठले व घडलेला प्रकार कुटुंबीयास सांगीतला, तेव्हा वनातुन रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडीत चिमुरडीस घेवुन कुटुंबीयांनी यावल पोलिस ठाणे गाठले व येथे पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, महिला पोलिस कर्मचारी सिमा चिखलकर यांनी पिडीतावर प्राथमिक उपचार करून नंतर तिच्या आईची फिर्याद घेण्याचे काम सुरू केले रात्री उशीरा पर्यंत बालकांचे लैंगिक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर संशयीताचा शोध घेण्या करीता रात्रीचं हवालदार असलम खान, गोरख पाटील, राहुल पांचाळ, निलेश वाघ यांचे पथक जंगलात रवाना झाले. जागतिक आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या घटने मुळे समाज मन सुन्न झाले आहे.