राजकीय

BHR घोटाळा प्रकरणी भाजप नेते आ. गिरीष महाजनांचे मोठे वक्तव्य

जळगाव -बीएचआर प्रकरणी सुनिल झंवरसह अनेकांना अटक झालेली असून त्यांच्या चौकशीतून जे काही तथ्य असेल ते समोर येईलच,पोलिस यंत्रणा योग्य रीतीने तपास करीत असून त्यातून जे काही निष्पन्न व्हायचं आहे ते होईलचं ,तसेच बीएचआर घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य सूत्रधार सुनील झंवर हे सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असून कुणी नाही म्हणून दाखवावेच असे प्रतिपादन आज भाजप नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी जळगाव येथे केले.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अतिशय भयंकर अवस्था असून आता दुष्काळाचे सावट आहे. यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, भाजप महानगर प्रमुख दिपक सुर्यवंशी यांचेसह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यात सरासरी पेक्षा फक्त 25% ते 30% इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही धरणामध्ये,नदीमध्ये ओढ्यामध्ये थेंबभरही पाणी साठलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्यामुळे ज्वारी,कापूस आणि मका यांसारखी प्रमुख पिके उद्धस्त होण्याच्या मार्गावर असून यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयाःचे नुकसान होणार आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्या वेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झालेले होते.त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही,ती तात्काळ मिळायलाच पाहिजे.तसेच जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासह शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ अदा करावी. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी आ.गिरीष महाजन यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.