क्राईम

BHR घोटाळा-मुख्य संशयीत सूत्रधार सुनिल झंवरला अटक,अनेकांची धाकधूक वाढली

IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांचा दुजोरा

पुणे – बीएचआर आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. गेल्या अनेक दिवसांपासुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सुनिल झंवरचा मागील 10 दिवसापासून पोलिसांना नाशिकमध्ये सुगावा लागलेला होता. त्यांनतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी आपल्या तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.यापूर्वी तो इंदौर आणि अहमदाबाद येथून भटकत काल रात्री तो नाशिक मध्ये पोहचला होता. नाशिकला पोहोचल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तो थांबलेल्या एका इमारतीला सर्व बाजूने घेराव घातला. सुनिल झंवरच्या पसार होण्याचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर आज सकाळी 11 वाजता पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.
या कारवाईला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिलेला आहे.विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी ज्यावेळी झंवर गॅलरीत आला,त्यावेळी तो झंवरच असल्याचे त्याच्या नव्या हेअरस्टाईल वरून लक्षात येत नव्हते. अशात त्याचे दूरवरून गपचूप फोटो काढून तो सुनिल झंवरच असल्याचे नक्की सिद्ध झाले. त्यानंतर त्याची नाशिक येथेच वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पथक आता झंवरला घेऊन पुण्याला निघालेले आहेत.
सुनील झंवरच्या अटकेने त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून आता अनेकांना घाम फुटणार आहे.या प्रकरणात आधीच अनेक जण फरार असून त्यात एका आमदाराचा समावेश आहे. सुनिल झंवर सारखा मुख्य संशयीत सूत्रधार गळाला लागल्याने यातून आता आणखी धक्कादायक नावे समोर येणार असल्याची शक्यता आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.