पोलिस प्रशासन

CP कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली केल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा दावा,पुन्हा वसुलीकांडामुळे खळबळ

पुणे दि-6 मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग व एपीआय सचिन वाझेच्या गाजलेल्या 100 कोटींच्या वसुली कांडानंतर राज्यासह देशभर खळबळ उडालेली होती‌. आता त्याहीपुढे जाऊन पुणे पोलीस दलातील आणखी एका तब्बल 200 कोटींच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र समोर आलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं असून ,या पत्रामध्ये तत्कालिन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी पिपंरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणातून 200 कोटींची वसुली करण्यात आली असल्याचा आरोप सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी केल्याच एक पत्र समोर आलेलं आहे.चक्क तत्कालिन आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर थेट वसुलीचे आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.कनिष्ठ पदावर असल्यामुळे हे करण्यापलिकडे कोणता पर्याय नव्हता असेही त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आले.आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली.प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची.आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे.पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे.राष्ट्रवादीच्या संबंधित असलेल्या स्पर्श घोटाळ्या प्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले होते.
सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले.पिंपरीमध्ये बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.
नेमका आरोप काय?
सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र लिहून कृष्ण प्रकाश यांच्यासाठी 200 कोटी रुपये वसुली केली असल्याचा दावा
कनिष्ठ पदावर असल्यामुळे हे करण्यापलिकडे कोणता पर्याय नव्हता असेही त्यांनी सांगितले आहे.
शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरणं हाताळण्यास सांगितले जात होते.
आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली.
प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची.
आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे.
पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे.
राष्ट्रवादीच्या संबंधित असलेल्या स्पर्श घोटाळ्या प्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले होते.
सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले.
पिंपरीमध्ये बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.
पत्रात काय म्हटलं आहे?
मी वरील नमुद विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो, की पिंपरी चिंचवड चे माजी पोलीस ४ आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्‍यता असून, यापासून मला संरक्षण मिव्ठावे ही विनंत्ती. मी नऊ वर्षापूर्वी फौजदार म्हणून पोलीस दलात भरती झालो आहे. त्यानंतर तीन वर्षापूर्वी माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे झाली. मी बराच कालावधी हा नियंत्रण कक्ष येथे काढला आहे. कृष्ण प्रकाश यांची आयुक्त म्हणूत्न नियुक्ती झाल्यावर मी शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात माझी नेमणूक करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली होती.
तेव्हा त्यांनी मला सामाजिक सुरक्षा है स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. निरीक्षक विठुठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक काम करीत असताना आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मनाप्रमाणे काम होत नसल्याचे कारण देत कुबडे यांना हटवून तेथे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांना नेमण्यात आले. तर मला सामाजिक सुरक्षा पथक प्रमुख आणि वाचक शाखेचे कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आले. वास्तवात कुबडे चांगले काम करीत असतानाही त्यांना बदलण्यात आले होते.
सामाजिक सुरक्षा पथक बरोबरीने मला वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले होते. या कालावधीत शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरणं हाताळण्यास सांगितले जात होते. यातून मिळणारा पैसा करोड़ो रुपयांमध्ये असल्याने मला है पैसे स्वीकारण्यास सांगितले जात होते. आत्ता पर्यंत आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान २०० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. वास्तवात आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समोर आले. पण मी पदाने कनिष्ठ असल्याने है सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता.


सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होत. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे.
सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत.
या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलेलो आहे.
यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही अस सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबावर ठाम आहे, असं या व्हायरल झालेल्या पत्रात लिहिलेलं आहे.
तो बनावट खरेदी घोटाळा पुन्हा चर्चेत
काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यात बनावट खरेदी खत व बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा खरेदी-विक्री घोटाळा समोर येऊन तब्बल 44 उपनिबंधक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले होते. या घोटाळ्याशी एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याचा संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.त्या घोटाळ्याचा तपास सुरू असून या पत्रामुळे तो कोट्यवधींचा खरेदीखत घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.