मुंबई: Eknath shinde | Devendra Fadanvis | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आज गोव्याहून मुंबईत दाखल झालेले असून ते आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचेसह भाजपचे अनेक आमदार या ठिकाणी
उपस्थित असून त्यांच्याशी एकनाथ शिंदे हे चर्चा करत आहे.तसेच आता ते राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.तसे झाल्यास आजच महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
फडणवीस सरकारचा शपथविधी
त्यानंतर सायंकाळी 7 वाजेला राजभवनातील दरबार हॉल येथे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथविधी करणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे.त्यामुळे आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेलं दिसणार आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेणार असून त्यांचे भावी उद्दिष्ट आणि भूमिका नेमकी काय राहणार आहे हे स्पष्ट करणार आहेत त्यामुळे आता राजभवनाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहेत.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर देखील आता चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी अनेक आमदार हे लॉबिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
Follow us Mediamail Social👇