ठाणेराजकीयवृत्तविशेष

Eknath shinde | एकनाथ शिंदेंच्या मूळगावच्या गावकऱ्यांची इच्छा पूर्ण होणार | एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास वाचा सविस्तर

मुंबई- Eknath shinde | विधान परिषदेच्या निकालानंतरच्या सुरू झालेल्या सत्तासंघर्षाला अखेर आता विराम लागण्याची चिन्हं दिसु लागलेली आहे.उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षित घोषणा केली आणी सर्वांनाच धक्का दिला.आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून 7.30 वाजेला राजभवनात शपथ घेणार आहेत. 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शपथ देतील. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

हे पण वाचा कनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री, महाराष्ट्रात “शिंदेशाही” | देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक

Eknath shinde | एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून आता विराजमान होणार आहेत.

एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत संबोधले जातं, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिलेला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 50 आमदार आहेत. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दलचा जाणूया
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रूवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दरे या गावी झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली. याशिवाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दारूच्या कारखान्यात काम केलेलं आहे. 

Eknath shinde | यांच्या मूळगावकरांची इच्छा पूर्ण होणार

रोजगाराच्या शोधासाठी गाव सोडून शहराकडे निघालेल्या वडिलांचे बोट पकडून शालेय जीवनातच ठाण्यात राहावयास आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रभर नाव कमावलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढील प्रत्येक पावलाकडे साताऱ्यापासून ८५ किमीवर असलेल्या सह्याद्री डोंगररांगांतील दरे या गावचे लक्ष लागून राहिले आहे. गावच्या काही समस्यांवर मार्ग काढलेल्या शिंदे यांनी आता मुख्यमंत्री होऊन गावात यावे,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.ती गावकऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.
1980 दशकात त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांपर्यंत पोहोचणारा महाराष्ट्रात शिवसेना हा एकमेव पक्ष होता. 
1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.
2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत  
1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 
2014 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले
एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. 

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.