ठाणेमुंबईराजकीय

Eknath Shinde | एकनाथ शिंदे गोव्याहून महाराष्ट्रात एकटे आले,मात्र जाताना मुख्यमंत्रीपद सोबत घेऊन गेले, आमदारांना आणण्यासाठी रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मध्यरात्रीच गोवा येथील ताज हॉटेलकडे रवाना झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे 50 आमदार हे गुवाहाटीहून थेट गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले असून त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे हे आत्ताच रवाना झालेले आहेत.

Advertisement by sponsored

राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिल्याने सर्व आमदारांना बहुमत चाचणी करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे.तसेच मंत्री मंडळ विस्तारही होणार असल्याने त्याचाही शपथविधी समारंभ होणार आहे. त्यामुळे आमदारांना आता महाराष्ट्रात परतणे आवश्यक झालेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले होते. त्यांच्यामुळेच आज ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकलेले आहेत. त्यामुळे आपल्या या सहकाऱ्यांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे रवाना झालेले आहेत. येताना फक्त एकनाथ शिंदे एकटे आलेले होते.जाताना मात्र ते अनपेक्षित पणे मुख्यमंत्रीपद सोबत घेऊन जात आहे ,अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.
भाजपचे 130 एकनाथ शिंदे गटाचे 50 असे एकूण 180 आमदारांचे संख्याबळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांनी तुफान जल्लोष केलेला होता नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे संवाद साधलेला होता. आता त्यांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांच्यासोबत महाराष्ट्रात परतण्यासाठी एकनाथ शिंदे गोव्याला रवाना झालेले आहेत.मुंबईत जोरदार पाऊस सुरू असूनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये ,यासाठी जागोजागी केंद्रीय पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिसांचा विशेष फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.