
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आता नुकतीच राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापने संदर्भात लागणारी आवश्यक प्रक्रिया पार करून आता त्याबाबत राज्यपालांशी चर्चा केलेली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर,आशिष शेलार उपस्थित होते.तसेच राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून त्यांचं हार्दिक अभिनंदन केलंलं आहे.या घटनेची सध्या एकच चर्चा सुरु आहे. राजभवनात आज काहींच्या चेहऱ्यावर नवीन सरकार स्थापनेचा आनंद असल्याचे दिसून आले.
आता राजभवनातील दरबार हॉल येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन भविष्यातील सरकारचे नवीन ध्येय धोरणे व वाटचाल या संदर्भात भाष्य करणार आहे.
एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री
सुरुवातीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करून एक मोठा धक्का दिला.त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली.तसेच ते स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. यामुळे पुन्हा एकदा बाळा साहेब ठाकरे यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सिद्ध झालेले आहे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे असून यामुळे भविष्यातील राजकीय डावपेच आखून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा मास्टरस्ट्रोक लगावला असल्याचे बोलले जात आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रसार माध्यमांना संबोधित करताना सांगितलेले आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या हिंदुत्वाच्या विचारांनी चालणाऱ्या पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या मात्र काही कारणास्तव भाजप आणि शिवसेना यांच्या कटुता येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आलेला होता मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये स्वतः मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना देखील शिवसेनेच्याच आमदारांची कामे होत नसल्याने आमदारांमध्ये व मंत्र्यांमध्ये प्रचंड असंतोष होता आता देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचे संख्याबळ जास्त असून देखील मुख्यमंत्री पद नाकारून माझ्यासारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे ते स्वतः सरकारमध्ये सहभागी होणार नसले तरीही त्यांचा सहकार्य आम्हाला लावणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही एकनाथ शिंदे यांनी आभार मानलेलं आहे.सायंकाळी 7.30 वाजता त्यांचा राजभवनात शपथविधी होणार आहे.