केंद्रीय योजना

EPFO ने सदस्यांना कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा आगाऊ रक्कम काढण्याची दिली परवानगी

नवीदिल्ली (वृत्तसंस्था PIB)- कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत आपल्या गुंतवणूकदारांना सहकार्य करण्यासाठी ईपीएफओने अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दुसऱ्यांदा बिगर परतावा आगाऊ रक्कम काढायला परवानगी दिली आहे. महामारीच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (PMGKY) मार्च 2020 मधे ही आगाऊ रक्कम काढण्याची विशेष तरतूद केली होती.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 मधे उप-परिच्छेद (3) ची, परिच्छेद 68L अंतर्गत भर घालत सुधारणा केली आहे. तशी अधिकृत गॅझेटमधे अधिसूचनाही दिली आहे.
या तरतुदीनुसार, 3 महिन्याच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याइतकी किंवा तुमच्या इपीएफ खात्यात असलेल्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम, यापैकी कमी असेल इतकी बिगर परतावा रक्कम उपलब्ध केली जाईल. सदस्य यापेक्षा कमी रकमेसाठीही अर्ज करु शकतात.
कोविड -19 काळात आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा ईपीएफ सदस्यांना खूपच सहाय्यभूत ठरते आहे, विशेषत: ज्यांचे वेतन दरमहा 15 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. आजच्या  तारखेपर्यंत ईपीएफओने  76.31 लाख कोविड -19 आगाऊ दावे निकाली काढले असून त्यापोटी 18,698.15 कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकॉसिस किंवा काळी बुरशीला नुकतेच साथीचा आजार घोषीत केले आहे. अशा कसोटीच्या काळात आपल्या सदस्यांना आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ईपीएफओ, मदतीचा हात देत आहे.
कोविड -19 च्या पहिल्या आगाऊ रक्कमेचा लाभ घेतला आहे ते सदस्य आता दुसऱ्यांदाही आगाऊ रक्कम काढू शकतात.
दुसऱ्यांदा कोविड 19 आगाऊ रक्कम काढण्याची तरतूद आणि प्रक्रिया पाहिल्याप्रमाणेच आहे.
या कसोटीच्या काळात , सदस्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे हे लक्षात घेता, कोविड -19 च्या दाव्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
दावे दाखल झाल्यानंतर तीन दिवसात ते निकाली काढण्यासाठी ईपीएफओ कटिबद्ध आहे. इपीएफओने यासाठी तंत्रज्ञानांधारित ऑटो-ड्रिवन प्रक्रीया राबवली आहे. यासाठी संबंधित सदस्यांनी केवायसीचे सर्व निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. इपीएफओला,या प्रक्रियेमुळे केवळ तीन दिवसात दावे निकाली काढणे शक्य होत आहे, एरवी याच कामासाठी नेहमीच्या नियमाप्रमाणे वीस दिवस लागतात.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.