महाराष्ट्रमुंबई

नाशिक कुंभमेळ्यासाठी तब्बल १७५०० कोटींचा प्रस्ताव, आकडा ऐकून नाशिककर अचंबित

दिनांक 15 मार्च 2024 रोजी झाली बैठक

केंद्र सरकार तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अतिशय सकारात्मक असल्याने 2026-27 या कालावधीत आपल्या नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्याकरिता केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी
करण्यासाठी मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार असल्याने त्यासाठी देखील नियोजन करण्यात यावे. मागील कुंभमेळ्याप्रमाणेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडण्यासाठी गेल्या कुंभमेळ्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा देखील यावेळी घेण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ येत्या कुंभमेळ्यासाठी होईल.
पुढील जिल्हास्तरीय बैठकीत साधुसंत, पुरोहित यांना देखील आमंत्रित करावे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सूत्रबद्ध पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी व सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय रहावा यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखील समिती स्थापन करण्याच्या सूचना ही यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी दिनांक 15 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या आहेत.

तब्बल १७५०० कोटींचा प्रस्ताव
बैठकीच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने तब्बल ११५०० कोटींचा प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित आमदारांनी कोणत्या स्वरुपाची कामे करणे आवश्यक आहेत त्या स्वरूपात सूचना मांडल्या. तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी देखील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर त्र्यंबकेश्वर येथील सद्यस्थितीची माहिती दिली.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी झालेल्या आगामी २०२६-२७ च्या नाशिक कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठकीत पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे बोलत होते. त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, ११५०० कोटींचा प्रस्ताव नाशिक महापालिकेचा असून सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विकास विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रस्ते विकास महामंडळ व इतर विभागांचा मिळून ६००० असा १७५०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. ज्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार असून इथलं नैसर्गिक वातावरण उत्तम असून इथलं धार्मिक महत्त्व सुद्धा खूप जास्त आहे.ज्या पद्धतीने सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा इतर कारणांनी नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतेय ,त्या अनुषंगाने भविष्याच्या दृष्टिकोनातून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकासाच्या योजना राबविण्यासाठी जास्तीत जास्त निधी पदरात पाडून विकासकामे करून घेण्यासाठी नाशिकसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी‌ जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गिरीष महाजन म्हणाले, 2026-27 या वर्षामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर व त्र्यंबक येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्त्यांच्या दुतर्फा आवश्यक सुविधा सौंदर्यीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्र मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत आगामी कुंभमेळ्यात साधुमहंत व भाविकांची संख्या ही दुप्पटीने वाढणार असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने पार्किंगचे नियोजन केले जाणार आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button