राज्य-देश

LIC चा कोट्यवधी पाॕलिसीधारकांना सावधानतेचा इशारा !

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC च्या पॉलिसीधारकांसाठी एक मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. यात खरे तर LIC ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. काही भामटे पॉलिसीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे एलआयसीच्या निदर्शनास आलेले आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांना या प्रकारच्या फसवणुकीबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सावधगीरीचा इशारा दिलेला आहे. काही लोक एलआयसीचे तोतया किंवा बोगस अधिकारी बनून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. अनेक जणांची तोतयेगिरी उघडकीस आलेली असून यात अनेकांवर या प्रकरणी ठगबाजीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. असले ठगबाज एलआयसीचे अधिकारी भासवून आधी ग्राहकांना पटवून त्यांचा विश्वास संपादन करतात. मग ग्राहकांकडून त्यांची वैयक्तिक व बँक डिटेल्सची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे वर्ग करतात, यासाठी त्यांची विशिष्ट टोळी कार्यरत आहे.

LIC कडे अशी करा तक्रार

जर आपल्यालाही LIC बाबत असा कॉल आला तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकता. आपल्याला आपल्या पॉलिसीची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील जाणून घ्यायचे असल्यास आपण एलआयसीच्या पुढील वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता. [email protected]
यावर तक्रार करू शकता. या व्यतिरिक्त आपण [email protected] ईमेल करून तक्रार दाखल करू शकता. त्या व्यतिरिक्त आपण एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरची माहिती काढून टाकू शकता आणि आपली तक्रार तिथे नोंदवू शकता, असे LIC तर्फे ट्विट करण्यात आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.