रंजक माहितीवृत्तविशेष

Mawsynram | चेरापुंजी नाही तर “या” ठिकाणी पडतो जगातील सर्वाधिक पाऊस,भारतातच आहे “हे” ठिकाण

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे नोंद

Mawsynram | चेरापुंजी नाही तर “या” ठिकाणी पडतो जगातील सर्वाधिक पाऊस,भारतातच आहे “हे” ठिकाण

जगभरात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो ? तर तुम्हाला चेरापुंजी हेच नाव माहिती असेल मात्र, तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मेघालयातील मसिनराममधला आहे, जे जगातील सर्वात पावसाचे ठिकाण मानले जाते. मसिनराम या ठिकाणाने आता नवा विक्रम केलाय. ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे.


गुरुवारी, १६ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू झालेला या ठिकाणचा मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सुरू होता. हा पाऊस इतका जबरदस्त होता की अवघ्या २४ तासात १००३.६ मिमी पाऊस पडला. याआधी चेरापुंजीत १६ जून १९९५ रोजी एकाच दिवसात १५६३.३ मिली इतका जोरदार पाऊस झाला होता.
या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवन तेथील हवामानावर अवलंबून असतं. मसिनराम आणि चेरापुंजीमध्ये हवामान नेहमी दमट असते. लोकांचे कपडे, अन्न आणि काम वाळवंटात राहणाऱ्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. या भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे इथे शेती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे इथे सर्व काही इतर गावांतून, शहरांतून येतं. हा माल प्लास्टिकमध्ये गुंडाळून ड्रायरने वाळवून विकला जातो.
येथे लोक नेहमी बांबूच्या छत्र्या सोबत ठेवतात. त्यांना कानूप म्हणतात. लोक कामावर जाण्यासाठी प्लास्टिक घालतात. पावसामुळे रस्ते लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्यात लोकांचा बराच वेळ जातो. जीवन खूप कठीण आहे आणि पावसामुळे ते अधिक कठीण होते.

अतिवृष्टीने बनलेले शिवलिंग


येथे बांधलेले पूलही नेहमीच जीर्ण अवस्थेत राहतात. हे पाहता दरवर्षी स्थानिक लोक झाडाच्या मुळांना बांधून बांबूचा पूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करतात. रबर किंवा बांबूचे पूल बहुतेक मजबुतीमुळे बनवले जातात. ते पाण्यात लवकर खराब होत नाहीत किंवा भाराखाली तुटत नाहीत. नीट बांधल्यास बांबूचा पूल जवळपास एक दशक टिकतो.
७ जून १९६६ रोजी मसिनरामला एका दिवसात ९४५.५ मिलिलिटर पाऊस पडला, जो त्यापूर्वीचा एक दिवसाचा सर्वाधिक पाऊस होता. हे ठिकाण चेरापुंजीच्या शेजारी १५ कि.मी. अंतरावर आहे. जिथं एवढा पाऊस पडतो, तिथं माणसं कशी राहात असतील, असा विचार हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंंतर येतो.
जगातील सर्वाधिक आर्द्रता असलेले ठिकाण म्हणून मेघालय राज्यामधील खासी हिल्स जिल्ह्यातील मसीनरामचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. बंगालच्या उपसागरामुळे येथे भरपूर आर्द्रता आहे. तसंच येथे सरासरी वार्षिक पाऊस ११,८७१ मिमी आहे. मात्र १६ जून रोजीच १० टक्के पाऊस झाला.
मसीनराम हे नैसर्गिक सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. पावसात उंचावरून कोसळणारा पाण्याचा झरा आणि धुक्यासारखे दाट ढग जवळून पाहणे म्हणजे आनंदच असतो. मसिनराम जवळ मावजिम्बुइनच्या नैसर्गिक गुहा आहेत, त्या त्यांच्या स्टॅलेग्माइट्ससाठी प्रसिद्ध आहेत. स्टॅलेग्माइट्स म्हणजे गुहेच्या छतावरून टपकून जमिनीवर जमा झालेला चुना.


इतका मुसळधार पाऊस इथेच का पडतो ?
‘बंगालचा उपसागर’ मान्सून ही दक्षिण हिंदी महासागरातील कायम वाऱ्यांची शाखा आहे, जी विषुववृत्त ओलांडून पूर्वेकडे भारतात प्रवेश करते. हा मान्सून प्रथम म्यानमारच्या अरकान योमा आणि पिगुयोमा पर्वतरांगांना धडकतो, त्यामुळे ईशान्येत मुसळधार पाऊस पडतो. मग हे मान्सूनचे वारे थेट उत्तरेकडे वळतात आणि गंगेच्या डेल्टा प्रदेशातून खासी टेकड्यांवर पोहोचतात. समुद्र सपाटीपासून सुमारे १५,००० मीटर उंचीपर्यंत मेघालयातील चेरापुंजी आणि मसिनराम नावाच्या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.