कोकणठाणेमुंबईरत्नागिरीरायगडसिंधुदुर्ग

Mumbai Rain | मुंबई, कोकणात पावसाची जोरदार बॅटींग,आज मुसळधार पावसाचा ऑरेंज ॲलर्ट (orange alert)

मुंबई: (Mumbai Rain Updates) मुंबईत एकीकडे राजकारणात जोरदार बॅटींग सुरू असतानाच दुसरीकडे शहर आणि उपनगरात आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस झालेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने (BMC Rain alert) ट्विट करून मुंबई व ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे.

Adv by sponsored

हे पण वाचा :

महाराष्ट्राचा ‘शॅडो मुख्यमंत्री’ आता कोण होणार ? राष्ट्रवादीचा होणार की शिवसेनेचा ?

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा


सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दादर, अंधेरी वांद्रे आणि कुर्ला या भागांमध्ये कालपासून सर्वच रस्ते जलमय झालेले असून अनेक ठिकाणी सबवेमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर काल रात्री दादर स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं दोन लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला होता. तसेच आज सकाळपासून देखील सेंट्रल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा सध्याचा जोर आणखी वाढल्यास आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच समुद्रकिनारी भागात सुद्धा न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.