मुंबई

NCB विभागीय आयुक्तपदी अमित घावटे यांची नियुक्ति

मुंबई दि-14 अमली पदार्थ नियंञण विभागाच्या (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) विभागीय आयुक्तपदी आता अमित फक्कड घावटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सेवा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्या पदाचा कार्यभार हा विजेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आला होता. अमित घावटे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. एनसीबी मुंबईचे विभागीय आयुक्त म्हणून ते लवकरच पदाचा कार्यभार स्विकारणार आहे.
आता मुंबई NCB विभागीय आयुक्त पदाच्या कार्यभारासोबतच त्यांच्याकडे एनसीबी चेन्नई आणि एनसीबी बंगळुरू असा अतिरिक्त कार्यभारही असणार आहे.


मुंबईचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हा विभाग 2020 पासूनच चर्चेत आला. मागील वर्षी बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे ही ड्रग्ज केसेसच्या निमित्ताने समोर आली. या कारवायांमध्ये एनसीबीची भूमिका महत्वाची होती. त्यासोबतच राजकारण्यांची मुलेही यानिमित्ताने चर्चेत आली.बॉलिवुड सेलिब्रिटींना समन्स बजावण्यापासून ते चौकशीला बोलावण्याच्या बातम्या एनसीबीच्या धडक कारवायांमुळे गाजल्या. सुशांतसिंग राजपुत मृत्यूच्या प्रकरणानंतरच एनसीबीच्या कारवायांना वेग आला होता. त्यानंतर कॉर्डिलिया ड्रग्ज क्रुझ प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवर एनसीबीने केलेल्या कारवाईमुळे एनसीबीची मुंबई टीम अधिक चर्चेत आली. त्यामध्ये प्रामुख्याने एनसीबी मुंबईचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे हे चर्चेत आले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.