Crimeकोर्ट निकाल

Nupur Sharma | देशात जे काही घडत आहे त्यासाठी नुपूर शर्मा एकटीच जबाबदार,देशाची माफी मांगावी- सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नुपुर शर्मा बेताल वक्तव्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

adv by sponsered

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर नुपुर शर्मा यांनी केलेल्या टीकेनंतर देशभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालेलं होत.याबाबत दाखल एफआयआरच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आज शुक्रवारी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माला चांगलेच फटकारले.

हे पण वाचा : महाराष्ट्राचा “शॅडो मुख्यमंत्री” कोण होणार


न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर आयोजीत कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात “विचलित करणारी” विधान केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जोरदार टिप्पणी केली.
न्यायालयाने सुनावणीदरम्यान उदयपूर हत्याकांडाचा संदर्भ दिला आणि सांगितले की नुपुर शर्माने तिच्या “मोकळ्या जिभेने” परिणामांचा विचार न करता “बेजबाबदार टिप्पण्या” केल्या.या बेजबाबदार वक्तव्यांच्या मागे शर्मांचा काय हेतू होता ,यामुळे देशात आज जे काही विपरीत घडतय त्याला नुपुर शर्मा एकटीच जबाबदार आहे.असे आज सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.

हे पण वाचा : आता विधानसभा अध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली सुरू, तिन जणांची नावे चर्चेत


केवळ राष्ट्रीय राजकीय पक्षाचे प्रवक्ते असण्याने कोणत्याही व्यक्तीला बेजबाबदारपणे अशा धार्मिक त्रासदायक गोष्टी बोलण्याचा परवाना मिळत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.तसेच याबाबत नुपुर शर्मांनी टिव्हीवर जाऊन देशाची जाहीर माफी मागावी,असेही सुचवले आहे.

हे पण वाचा : ना ठाकरे ना फडणवीस,विठूरायाची पूजा आता कोण करणार ?

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.