PM नरेंद्र मोदी संत तुकाराम महाराजांच्या देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण करणार
पहिल्यांदाच एखादा पंतप्रधान तुकाराम महाराजांच्या देहूत येणार

पुणे : वारकरी संप्रदयाकडून एक मोठी बातमी समोर आलेली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील देहू येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी हे निमंत्रण स्विकारलेलं असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 14 जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूनगरीत पहिल्यांदाच दाखल होणार आहेत. यामुळे या कार्यक्रमाची आता देहू संस्थांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे. देहू संस्थानाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला असून लवकरच याबाबत लवकरच प्रसिद्धिपत्रक काढणार असल्याचे संस्थानाकडून सांगण्यात आलेलं आहे.