राष्ट्रीय

President Election 2022 | राष्ट्रपतीपद निवडणूक 2022 | निवडणूक वेळापत्रकाची अधिसूचना जारी

President Election 2022 | राष्ट्रपतीपद निवडणूक, 2022 , निवडणूक वेळापत्रकाची अधिसुचना जारी

भारतीय राजपत्रात आज (15 जून, 2022) प्रकाशित झालेल्या अधिसूचनेद्वारे, राष्ट्रपती निवडणूक, 2022 साठी खालील वेळापत्रक निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे;-

 1. 29 जून 2022, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
 2. 30 जून 2022, उमेदवारी अर्जांची छाननी
 3. 2 जुलै 2022, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
 4. 18 जुलै 2022, आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल.

आयोगाने 13 जून, 2012 रोजी आणखी एक अधिसूचना जारी केली होती.  त्यानुसार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांची 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली. तर, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मुकुल पांडे आणि राज्यसभा सचिवालयातील मुख्य दक्षता अधिकारी तसेच संयुक्त सचिव सुरेंद्र कुमार त्रिपाठी यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक नियम, 1974 च्या नियम 3 अंतर्गत आवश्यक आहे त्यानुसार, निवडणूक अधिकारी यांनी 15 जून, 2022 रोजी जाहीर सूचनेद्वारे सूचित केले आहे की:

 1. उमेदवाराने किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकांनी किंवा समर्थनकर्त्यांद्वारे त्यांच्या कार्यालयात, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकडे किंवा तो अपरिहार्यपणे गैरहजर असल्यास सहायक निवडणूक अधिकारी, मुकुल पांडे, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) सुरेंद्र कुमार त्रिपाठी,  संयुक्त सचिव आणि मुख्य दक्षता अधिकारी, राज्यसभा सचिवालय, यांच्या कार्यालयात सकाळी 11  आणि दुपारी 3 दरम्यान (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) उमेदवारी 29 जून 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज पाठवू शकतो,.
 2. प्रत्येक उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराची ज्या लोकसभा मतदारसंघात  मतदार म्हणून नोंदणी आहे त्या मतदार यादीतील उमेदवाराशी संबंधित नोंदीची प्रमाणित प्रत असावी;
 3. प्रत्येक उमेदवाराने रुपये पंधरा हजार फक्त, इतकी रक्कम जमा करावी.  ही रक्कम निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज  सादर करताना रोख स्वरूपात जमा केली जाऊ शकते किंवा आधी भारतीय रिझर्व्ह बँकेत किंवा सरकारी कोषागारात जमा केली जाऊ शकते. तसे केले असल्यास नंतर ही रक्कम जमा झाल्याचे दर्शवणारी पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे;
 4. वरील कार्यालयातून वर दिलेल्या वेळी उमेदवारी अर्ज मिळू शकतात;
 5. कायद्याच्या कलम 5B च्या पोटकलम (4) अन्वये रद्द करण्यात आलेल्या  उमेदवारी अर्जांव्यतिरिक्त इतर अर्ज गुरूवार, 30 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता  समिती कक्ष क्रमांक 62, पहिला मजला, संसद भवन, नवी दिल्ली येथे छाननीसाठी घेतले जाईल.
 6. उमेदवाराने, किंवा त्याच्या प्रस्तावकांपैकी किंवा समर्थकांपैकी कोणीही, ज्यांना या निमित्त उमेदवाराने लिखित स्वरूपात अधिकृत केले आहे, उपरोक्त परिच्छेद (i) मध्ये निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तींना 2 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नोटीस पाठवली जाऊ शकते.
 7. निवडणूक घेण्याची आवश्यकता असल्यास, सोमवार, 18 जुलै 2022 रोजी सकाळी 10 आणि दुपारी 5 दरम्यान नियमानुसार निश्चित केलेल्या मतदानाच्या ठिकाणी मतदान घेण्यात येईल. 

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या राजपत्रांमध्ये या अधिसूचना आणि निवडणूक अधिकारी यांनी जारी केलेल्या सार्वजनिक सूचना एकाच वेळी प्रकाशित करण्याची व्यवस्था देखील केली आहे.

निवडणूक प्रक्रियेसंबंधी कोणत्याही शंकानिरसनासाठी,  पी. सी. मोदी, राष्ट्रपती निवडणूक, 2022 चे निवडणूक अधिकारी आणि राज्यसभा सरचिटणीस यांच्याशी त्यांच्या कार्यालयात (खोली क्रमांक 29, तळमजला, संसद भवन, नवी दिल्ली)

उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत म्हणजेच 18 जून 2022 पर्यंत (सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त) शनिवारसह सर्व कामकाजाच्या दिवशी दुपारी 3.30 ते 4.30 दरम्यान संपर्क साधता येईल.  

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.