अर्थकारण

RBI केंद्रशासनाला तब्बल 99122 कोटी रूपयांचा सरप्लस निधी देणार

नवी दिल्ली दि:-21 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने केंद्र सरकारला 99122 कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा निधी मिळणार आहे. जुलै 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंतची ही सरप्लस रक्कम केंद्र सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.

RBI केंद्राला निधी का देणार ?

सरकारी बाँड, सोन्यावर करण्यात आलेली गुंतवणूक आणि विदेशी बाजारात होणारं फॉरेक्स आणि बाँड ट्रेंडिंग हे आरबीआयच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात. गेल्यावर्षी सोने आणि विदेशी मुद्रा बाजार तेजीत होते. त्यामुळे बँकेने मोठ्या नफ्यावर डॉलरची विक्री केली आणि मुद्रा बाजारात रेकॉर्ड स्तरावर बाँडची खरेदी केली. त्यामुळे आरबीआयला चांगले रिटर्न्स मिळाले होते. परिणाी यंदा आरबीआयकडे सरप्लस निधी अधिक असल्याने आरबीआयने हा निधी केंद्र सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरप्लस निधी म्हणजे काय ?

आरबीआयला त्यांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. त्यामुळे आपल्या आवश्यक गरजा पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक तरतुदी, गुंतवणुकी केल्यानंतर जी रक्कम उरते त्याला सरप्लस अमाउंट म्हणतात. हा निधी सरकारला द्यावा लागतो. बाँडमध्ये पैसा गुंतवल्यानंतर मिळाणारं व्याज हा आरबीआयचं उत्पन्नाचं महत्त्वाचा स्त्रोत आहे. सर्व गरजा आणि आवश्यक गुंतवणूक पूर्ण केल्यानंतर जी रक्कम उरते ती आरबीआयला केंद्राला द्यावी लागते. 2017-18 या आर्थिक वर्षात आरबीआयने केंद्राला 14 हजार 200 कोटी रुपये दिले होते. आरबीआयने हा निधी कंटिंजेन्सी फंडातून दिला होता. विशेष म्हणजे सीएफमध्ये आरबीआयचा जेवढा हिस्सा जातो, तेवढा सरप्लस निधी कमी होतो.

आरबीआयचा ईमर्जन्सी फंड म्हणजे काय ?

आरबीआयकडेही एमर्जन्सी फंड असतो. मॉनिटरी पॉलिसी आणि एक्सचेंज रेटला मॅनेज करताना अचानक आलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या फंडाचा वापर करतात. 2017-18मध्ये सीएफ फंड 2.32 कोटी होता. हा निधी आरबीआयच्या एकूण अॅसेट्सच्या 6.4 टक्के इतका होता. 2013-14 पासून तीन वर्ष आरबीआयने सीएफमध्ये एकही पैसा ठेवला नव्हता. आरबीआयकडे अधिक ‘बफर’ (आर्थिक पुंजी) असल्याने सीएफमध्ये पैसा ठेवण्यात आला नव्हता, असं टेक्निकल कमिटीचं म्हणणं आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.