अर्थकारण

RBI ने आज कोट्यवधी ग्राहकांना केले सतर्क,आॕनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी “हे” जाणून घ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- बँकांच्या डिजीटल फंड ट्रान्सफरद्वारे ट्रान्झॅक्शन करत असलेल्या ग्राहकांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. आरबीआयने देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी आज एक अलर्ट जारी केलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करून सांगितलेले आहे की, दिनांक 23 मे रोजी NEFT ( national electronic fund transfer ) सेवा काही तास चालणार नाही, तर त्यामुळे ग्राहकांनी आधीपासूनच आर्थिक व्यवहारांचे नियोजन करा. आपल्याला या मुदतीच्या आत कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते अगोदरच करा म्हणजे तुम्हाला रक्कम पाठविताना अडचण येणार नाही.

NEFT ( national electronic fund transfer )
ही संपूर्ण देशात चालणारी एक अधिकृत पेमेंट सिस्टम आहे, ज्यामध्ये एका बँक खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.
NEFT च्या माध्यमातून ग्राहक काही मिनिटांतच पैसे ट्रान्सफर करू शकतात. आपण या सुविधेद्वारे देशातील कोणत्याही बँक शाखेत पैसे NEFT करू शकता.

RBI चा ग्राहकांना ॲलर्ट

RBI ने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि,’बँकांनी 22 मे रोजी कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशनमुळे NEFT 23 मे रोजी सकाळी 1: 01 ते दुपारी 14: 00 (दुपारी 12 ते 2) काम करणार नाही, परंतु RTGS सुविधा सहजतेने सुरूच राहील.’

याकाळात NEFT व्यतिरिक्त ग्राहक RTGS आणि IMPS (Immediate Payment Service) वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. IMPS द्वारे 2 लाखांपर्यंतची रक्कम रिअल टाइममध्ये अर्जंट ट्रान्सफर केली जाऊ शकते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.