राजकीय

RSS ची टोपी “काळी” का ? हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजप व संघावर निशाणा

मुंबई दि-14 आज अडीच वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांद्रा-कुर्ला संकुलाच्या (BKC) मैदानावर शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानिमित्त प्रचंड जाहीर सभेला संबोधित केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून गेल्या पन्नास वर्षांपासून आजपर्यंतचा इतिहास बघता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दादरच्या शिवाजी पार्कवर हजारो ऐतिहासिक सभा घेतलेल्या आहे. मात्र आता MMRDA ने विकसीत केलेल्या BKC च्या भव्य मैदानावर शिवसेनेची सभा पार पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील “खासबात”

“”दिल मे राम व हाताला काम हे आमचं हिंदुत्व”
देशातली पहिली बुलेट ट्रेन आपण मागितलेली नाही, हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. संघाला दोन चार वर्षात 100 वर्ष होतील. मग स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ होता. ठाकरे कुटुंब या लढ्यात होतं. संयुक्त यातून सर्वप्रथम जनसंघ बाहेर पडला कशावरून तर जागावाटपावरुन. तेव्हापासून मुंबईचा लचका तोडण्याचा यांचा हेतू आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप व संघावर निशाणा साधला असून RSS ची टोपी “काळी” का ? भगवी का नाही ? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.
बाबरीवरून फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस बाबरी पडली तेव्हा तु
मचं वय काय होतं ? तुम्ही बोलता किती? आमच्यावर शंका उपस्थित करता, मग देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार,भाजप, संघ ,ओवेसी आणि राज ठाकरेंवर हिंदुत्व ,विकास, Z+ सुरक्षानीती आणी महागाईच्या मुद्दय़ावर जोरदार निशाणा साधून धुव्वादार टोलेबाजी केली.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.