राष्ट्रीय

SBI ग्राहक आज UPI पेमेंट करू शकणार नाही- बँकेची माहिती

मुंबईःदि-14 मागील वर्षी कोरोनामुळे देशभर काही काळ लाॕकडाऊन लागल्यामुळे डिजिटल पेमेंटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान वाढलेला दिसून आलेला आहे. बहुतेक ग्राहकांकडे ॲंड्राॕईड व ओएस आॕपरेटींग सिस्टीम वर चालणारे स्मार्टफोन असल्याने युपीआयने व्यवहार करण्याचे प्रमाण शहरातून आता ग्रामीण भागात सुद्धा वाढलेले आहेत. पूर्वी, जिथे युपीआय पेमेंट फक्त मोठ्या दुकानांपुरते मर्यादित होते, ते आता लहान दुकानांमध्ये, चहाचे दुकान आणि पाणीपुरीपर्यंतही पोहोचले आहे. जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक युपीआय पेमेंटचा वापर करतात.
सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचे खाते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI)असेल तर आज तुम्ही 14 मार्चला यूपीआय पेमेंट करू शकणार नाही. यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय वापरकर्त्यांना अडचण येऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने या संबंधित माहिती आपल्या ट्विटर अकाऊंट वरून ट्विट करुन दिलेली आहे.

काय आहे कारण ?

एसबीआयने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी बँक ग्राहकांच्या दर्जेदार सोयीसाठी बँक आपलं यूपीआय प्लॅटफॉर्म सुधारत (Upgrade)आहे. 14 मार्च रोजी झालेल्या अपग्रेडमुळे एसबीआय ग्राहकांना बँकेचा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येऊ शकतात असे बँकेने म्हटले आहे. तर यावर बँकेने पर्यायही सांगितले आहेत.

ग्राहक खालील सेवांचा लाभ घेऊ शकता

यावेळी एसबीआयच्या ग्राहकांनी योनो अ‍ॅप (Yono App), योनो लाइट अ‍ॅप (Yono Lite App), नेट बँकिंग (SBI Net banking) किंवा एटीएम (ATM) वापरू शकतात अशीही माहिती बँकेने दिली आहे. अपग्रेडमुळे तुम्हाला यूपीआय सेवा वापरण्यात अडचण येत असल्यास ग्राहक या वरील सेवांचा वापर करू शकतात.

15 आणि 16 मार्चला देखील बँकिंग सेवा होतील प्रभावित

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) या बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनने विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपामुळे 15 आणि 16 मार्च रोजी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहिल्यास बँक शाखांचे कामकाज ठप्प होईल. परीणामी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असेही म्हटले आहे की या संपामुळे बँकेच्या कामावर परिणाम होऊ शकेल.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.