ठाणेपोलिस प्रशासनमुंबईशासन निर्णय

Vivek Fanasalkar Mumbai CP | विवेक फणसळकर यांची मुंबईच्या नवे आयुक्तपदी नियुक्ती,यांचे कोरोना काळातील अभिनव उपक्रम गाजले होते

Vivek Fanasalkar Mumbai CP | विवेक फणसळकर यांची मुंबईच्या नवे आयुक्तपदी नियुक्ती,यांचे कोरोना काळातील अभिनव उपक्रम गाजले होते

मुंबई : एकीकडे राज्यात सत्तासंघर्षाच्या खेळादरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहे.
काल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक पार पडली.त्यात मुंबई पोलीस आयुक्तपदी (Commissinor of Police Mumbai ) विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसळकर हे उद्धव ठाकरेंच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जाते. यापूर्वी ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.
राज्यातील पोलिस महासंचालक यांच्या पदानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित पद म्हणून मुंबईचे पोलिस आयुक्त पद ओळखले जाते. 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, फणसळकर मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्तीपूर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून काम करत होते.
दरम्यान 2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्याजागी ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती.
ठाण्यात विवेक फणसळकरांचा ‘दरारा’
विवेक फणसळकर यांची ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता.तब्बल दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळला. कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचवण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.तसेच कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलिस खात्यात थेट नियुक्ती पत्र देण्याचा आदर्शव्रत आणी अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं देशभर कौतुक झालेलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील फणसळकर यांच्या कार्याची दखल घेतली होती.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.