महाराष्ट्रमुंबईराजकीय

आमदार सिद्दिकी कांँग्रेस सोडून महायुतीत ! काँग्रेसचे आणखी 13 आमदार फुटणार ? राज्यसभा निवडणुकीत भाजप चौथी जागाही जिंकणार !

13 आमदार फुटण्याची कांँग्रेसला कुणकुण


मुंबई दि-  2 फेब्रुवारी, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील राजकारणात मोठे भूकंप होणार असल्याचे संकेत दिले होते.त्याचेच आणखी एक उदाहरण आता समोर आलेले आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती.सिद्दीकी घराणे मिलिंद देवरा समर्थक मानले जातात. त्यामुळे या महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आणखी 13 आमदार फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणुकीतील संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रवादीच्या शरद पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवार न देण्याचं समोर आलेलं आहे. वरील सर्व शक्यता खऱ्या ठरल्यास यामुळे भाजप चार तर शिवसेना शिंदे गट एक व राष्ट्रवादी अजित पवार गट एक अशा सर्व सहा जागा जिंकण्यासाठी महायुती प्रयत्नशील राहणार हे आता स्पष्ट होत आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसची कसोटी !
सध्या स्थितीत काँग्रेसकडे राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेले 42 चे संख्याबळ असूनही राज्यसभेतील एक जागा जिंकण्यासाठी असलेली आशा आता आणखी आमदार फुटल्यास नक्कीच कठीण होऊ शकते. त्यामुळे येणारा काळ काँग्रेससाठी कठीण कसोटीचा राहणार हे आता स्पष्ट होत आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात प्रचंड खळबळ झालेली आहे. काँग्रेसचे चक्क 13 आमदार हे महायुतीतील विविध पक्षांत याच महिन्यात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला राज्यात मोठे खिंडार पडणार असल्याचे संकेत मिळालेले आहे. याचे सरळ परिणाम राज्यसभेच्या निवडणुकीवर आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तणूक येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे.
कोण आहे बाबा सिद्दीकी ?
झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर आहेत. 
झिशान सिद्दीकी कोण आहेत ?
झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button