राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे अचानक दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण
मुंबई ,दि: १ एप्रिल , काल रात्री अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे दिल्ली रवाना झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे हे मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा असल्याची माहिती वारंवार देत होते मात्र अचानक त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीतून घेतलेली आहे. अशातच त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन धक्का तंत्राचा वापर केलेला आहे. एकनाथराव खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाशी सेटलमेंट करून सुनबाईला तिकीट मिळवून दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीरपणे केलेला आहे. तसेच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही वारंवार रक्षा खडसे यांच्या बाबतीत टोकाची भूमिका घेत खडसे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतील त्याच पद्धतीने आम्ही महायुतीचा प्रचार करू असे जाहीर केलेले आहे. कालच त्यांनी रक्षा खडसेंबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचा उल्लेख करून रक्षा खडसेंनी गेल्या दहा वर्षात शिवसेना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केलेला आहे. आताही त्या भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ‘एकला चलो रे’ भूमिकेतून प्रचार करत असून त्यांच्या बाबतीत नाराजगी कायम आहे असा दावा काल आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
त्यातच गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या होत्या. मात्र एकनाथ खडसे यांनी या सर्व चर्चांना वेळोवेळी पूर्णविराम दिलेला आहे.
आता पुन्हा एकनाथराव खडसे हे अचानक दिल्लीत दाखल झाल्याने ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलेला आहे. मात्र एकनाथराव खडसे यांनी याबाबत सांगितलेले आहे की, ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीत आले असल्याची माहिती दिलेली आहे. आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.