जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

‘ इतक्या ‘ कोटींचे बक्षीस, चिनावल ग्रामपंचायतला राज्यातून ‘ माझी वसुंधरा’ चे प्रथम पारितोषिक

जळगाव,दि-29/09/2024, जिल्ह्यातील चिनावल ता.रावेर या गावाला माझी वसुंधरा 4.0 या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून काल याबाबतची घोषणा संबंधित विभागाने केली आहे. या पर्यावरणपूरक यशस्वी अभियानामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक होत असून तब्बल 1 कोटी 75 लाखांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.


दरम्यान,जल अग्नी वायू आकाश पृथ्वी या पंचरात्वावर आधारित पर्यावरण पूरक ग्राम पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा माजी वसुंधरा ४.० यात चिनावल ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन गावात माजी वसुंधरा अभियानात राबविण्यात येणारे पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण विभाग पर्यावरण मंत्रालय जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली व यांनी दिलेल्या निकषावर आधारित पर्यावरण पूरक कार्य उत्कृष्टरित्या राबवणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायत पैकी चिनावल तालुका रावेर या ग्रामपंचायतीला संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. यात ग्रामपंचायतीला १ कोटी ७५ लाख व अभियानात सातत्य ठेवत ध्यास घेऊन माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव, उपसरपंच सौ शाहिन बी शे जाबीर ग्रामविकास अधिकारी कैलास भगत व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामस्थांना सहभागी करून पर्यावरण पूरक व माझी वसुंधरा अभियानाला अनुसरून उत्कृष्ट असे कार्य केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चिनावल ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे लवकरच हे पारितोषिक सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व सन्मान मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री, पर्यावरण मंत्रालय अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे.
माझी वसुंधरा ४.० या अभियानात चिनावल ग्रामपंचायतीने गेल्या ९ महिन्यात सोलर प्लॅन, कंपोस्ट खत, ग्राम स्वच्छता,वृक्ष लागवड,जल पुनर्भरण, कुटुंब कल्याण, पर्यावरण साक्षरता जनजागृती या पंचरात्वावर आधारित उपक्रम उत्कृष्ट व नियोजन बद्ध रित्या राबवत यात सातत्य ठेवले व राज्य भरात या अभियानात जोरदार उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने संबंधित विभागाने यांची दखल घेत ग्रमिण माझी वसुंधरा मध्ये थेट राज्य स्तरावर प्रथम पारितोषिक देऊन गौरव केला आहे तर अभियानात सातत्य सोबत उंच उडी घेत प्रथम क्रमांक मिळवल्याने या १ कोटी ७५ लाखा सोबत ५० लाखांचे अतिरिक्त बक्षीस सुद्धा जाहीर झाले आहे.
या बाबतीत काल च संबंधित विभागाने या बाबतीत घोषणा करुन संबंधित चिनावल ग्रामपंचायत ला या बाबत ची माहिती प्राप्त झाली आहे या साठी सरपंच सौ ज्योती संजय भालेराव, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे दरम्यान या आधी ही चिनावल ग्रामपंचायत ला माझी वसुंधरा चे राज्यस्तरीय तृतीय क्रमांक चे ५० लाखांचे बक्षीस मिळाले होते आज पुन्हा माझी वसुंधरा ४ .० चे बक्षीस जाहीर झाल्याने गावात आनंद व्यक्त केला जात असून सरपंच सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान या साठी सर्व ग्रामस्थ, संजय भालेराव सर, चंद्रकांत भंगाळे व सदस्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान सरपंच सौ ज्योती भालेराव उपसरपंच शाहिन बी व सर्व सदस्यांनी या बाबत आनंद व्यक्त करून जळगाव जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अभियानात सहकार्य करणारे कर्मचारी वृंद, रावेर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी व कर्मचारी यांचे सह ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button