पत्रकाराच्या तक्रारीची दखल,अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांवर ताशेरे, नेमकं प्रकरण काय ?
मुंबई दि-27/09/2024 राज्यातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ आज मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. या शिष्टमंडळाने आज हॉटेल ट्रायडेंट येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून घेतला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या सूचनाही आयोगाने जाणून घेतलेल्या आहेत.
दरम्यान, या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांची कानउघाडणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार बदल्या/नियुक्त्यांचा अनुपालन अहवाल अद्याप सादर न केल्याबद्दल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे २० ऑगस्टपर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. निवडणूक आयोगाच्या स्मरणानंतर पोलिसांनी आंशिक अनुपालन अहवाल सादर केला. मात्र मुख्य सचिवांकडून अद्याप अनुपालन अहवाल सादर न करण्यात आल्याने निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांची तात्काळ अंमलबजाणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निर्धारित वेळेत अनुपालन अहवाल सादर न करण्याची कारणे स्पष्ट करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाचं मुख्य सचिवांना पत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना तीन वेळा पत्र पाठवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत एकाच जागी 3 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दिनांक- 31 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात, सर्वोच्च निवडणूक मंडळाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना विशिष्ट परिस्थितीत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. 20 ऑगस्टपर्यंत अनुपालन अहवाल सादर करायचा होता. तथापि, 22 ऑगस्ट, 11 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी अनेक स्मरणपत्रे जारी करूनही, मुख्य सचिवांकडून असा कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही. पण आयोगाच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी दर्शवली. दिलेल्या कालावधीत या सगळ्यांची माहिती का दिली नाही ? हे स्पष्ट करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश दिले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढलेले आहेत.तसेच कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पत्रकाराच्या तक्रारीची दखल व गांभीर्य
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि रावेर लोकसभा मतदारसंघात काही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी मा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी मीडियामेल न्यूज चे संपादक पत्रकार मयुरेश निंभोरे यांनी आधी दिनांक -31/05/2024 रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे वारंवार उल्लंघन होऊनही जळगाव जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांनी कोणतीही प्रकारची नियमोचीत कार्यवाही केलेली नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दिनांक-16 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे ईमेल द्वारे पुराव्यांसह तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चौकशी होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केलेली होती. याबाबत त्यांचा तक्रार प्राप्त झाल्याचा ईमेल रिप्लाय सुद्धा करण्यात आलेला होता. संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने यात अनेक बड्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. गंभीर दखल घेऊन संबंधित सामान्य प्रशासन विभागाने महसूल व पोलीस प्रशासनातील जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळाल्याचे आता आजच्या बैठकीतील मुद्द्यांवरून स्पष्ट झालेले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील काही निवडक अधिकाऱ्यांमुळे राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्यसमोर आलेले आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात संबंधीत प्रकरण उर्वरित कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पत्रकार मयुरेश निंभोरे हे मा. मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची रीट याचिका दाखल करणार असल्याने सदरील जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यास मा.मुंबई उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यास तेव्हा मा. उच्च न्यायालयाला याबाबतचे उत्तर देणे अप्पर मुख्य सचिवांसह मुख्य सचिवांना अडचणीचे ठरणार याची खात्री झाल्याने सदरील बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे आता समोर आलेलं आहे. तसेच या प्रकरणी आता पुढे काय घडामोडी घडतात याकडे सुद्धा जळगाव जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून आहे.