महाराष्ट्रमुंबई

सांस्कृतिक प्रदूषण फैलावणाऱ्या षडयंत्रांपासून समाजाला सुरक्षित ठेवण्याची गरज – सरसंघचालक डॉ मोहन भागवत

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कट्टरवादी चिथावणीला 'अराजकतेचे व्याकरण' म्हटलंय

नागपूर,दि-12/10/2024, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन आणि स्वआधारित व्यवस्था हे विषय संघशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वयंसेवक समाजापुढे नेणार असून, या पंचपरिवर्तनासाठी संपूर्ण समाजाने सक्रियतेने सहभाग यावा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमी उत्सवात आज त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.
  विविध यंत्रणा आणि संस्थांकडून पसरवलेला विकृत प्रचार आणि वाईट मूल्ये भारतातील नवीन पिढीच्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर वाईट परिणाम करीत आहेत. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आहे, तिथे काय दाखवले जाते, मुले काय पाहत आहेत, यावर फारसे नियंत्रण नाही. त्या सामग्रीचा उल्लेख करणे म्हणजे सभ्यतेचे उल्लंघन होईल, असे हे अत्यंत घृणास्पद आहे. आपल्या स्वतःच्या घरात, फुटुंबात आणि समाजात जाहिराती आणि विकृत दृक-श्राव्य सामग्रीवर कायदेशीर नियंत्रणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादनही सरसंघचालकांनी केले.
   यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. कोपिल्लिल राधाकृष्णन यांच्यासह विदर्भ प्रांताचे संघचालक दीपक तामशेट्टीवार,  सह संघचालक श्रीधरराव गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक राजेशजी लोया उपस्थित होते.

सांस्कृतिक प्रदूषण फैलावणाऱ्या षड्यंत्रांपासून समाजाला सुरक्षित ठेवण्याची गरज

‘डीप स्टेट’, ‘बोकिज़म’, ‘कल्बरल मार्क्सिस्ट’ असे शब्द सध्या चर्चेत आहेत. सांस्कृतिक मूल्ये, परंपरा नष्ट करणे हे यांचे काम आहे. शिक्षण व्यवस्था, संवाद माध्यमे, बौद्धिक संवाद इत्यादींना आपल्या प्रभावाखाली आणणे आणि त्यांच्याद्वारे समाजातील विचार, मूल्ये आणि श्रद्धा नष्ट करणे, ही यांची कार्यपद्धती आहे. या पृष्ठभूमीवर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासनांद्दल अविश्वास आणि द्वेष बाडवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांपासून सावधानता बाळगण्याची गरज सरसंघचालकांनी प्रतिपादित केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूंच्या शीलसंपन्न शक्ति साधनेचे नाव
‘बलहीनोंफों नहीं पूछता, बलवानों को विश्व पूजता,
ही आजच्या जगाची पद्धत आहे. त्यामुळे उपरोक्त सद्भाव आणि संयमी वातावरण प्रस्थापित करण्यासाठी सज्जनांना सबल बनावे लागेल. जेव्हा शक्ती शीलयुक्त सद्‌गुणांनी भरलेली असते तेव्हा ती शांतीचा आधार बनते. दुष्ट लोक स्वार्थासाठी एकत्र येतात आणि सावध राहतात, केवळ शक्तीनेच त्यांना नियंत्रित कले जाऊ शकते. सज्जनांचा सर्वांशी सद्भावना ठेवून असतात पण एकत्र कसे यावचे ते सज्जनांना कळत नाही. त्यामुळे ते दुर्बल दिसतात. सज्जनांना ही संघटित सामर्थ्यनिर्मितीची अमता आत्मसात करावी लागेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदु समाजाच्या या शीलसंपद्म शक्तीच्या साधनेचे नाव आहे, असे. सरसंघचालकांनी सांगितले.
दरम्यान, सरसंघचालक पुढे म्हणाले की, बांगलादेशातील पाशवी अत्याचाराची परंपरा पुन्हा दिसून आली आहे. हिंदू समाज संघटित होऊन बचावासाठी घराबाहेर पडल्यामुळे बचावला, पण जोपर्यंत अत्याचारी जिहादी स्वभाव तेथे आहे, तोपर्यंत तेथील हिंदूसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळेच बेकायदेशीर घुसखोरी आणि लोकसंख्येच्या अगमतोलावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यासाठी मानवता आणि सद्भावना या मूल्यांच्या सर्व समर्थकांची, विशेषतः भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंची मदत आवश्यक आहे. सद्भाव आणि सहिष्णूतेचे रक्षण बलसंपन्न समाजच करू शकतो तसेच दुर्वलता घातक असून, भारतीयांना शक्ती जागरणाची आवश्यकता असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.
    मध्यपूर्वेत हमासने इस्रायलबरोबर पुकारलेल्या संघर्षाची व्याप्ती कुठपर्यंत पसरेल, याची जगाला चिंता लागली आहे. आपल्या देशातही अशी आव्हाने आणि समस्या उभ्या ठाकल्या आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. कोलकात्याची घटना लज्जास्पद आहे. अशा घटना होऊच नयेत याचे प्रयत्व व्हायला हवे. खियांना संरक्षण देण्याची गरज आहे. अपराध आणि राजकारणाच्या संगनमताने असे दुराचार शक्य झाले आहेत, असेही सरसंघचालक म्हणाले.
  सर्व समाजाचे मंदिर, पाणी, स्मशान एकत्र रहायला हवे. सर्व जातीबांधवांनी आपापल्या संत, महापुरुषांचे उत्सव एकत्रितपणे साजरे करायला हवे. देश विदेशात काय सुरू आहे, याची कल्पना समाजबांधवांना द्यावी. सर्वांनी मिळून आपल्या क्षेत्रात संपूर्ण समाजाची कोणती समस्या आहे, त्यावर उपाययोजना करावी, ही बाबही सरसंघचालकांनी अधेरेखित केली.
    या वर्षी आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांची २०० वी जयंती आहे. भारताच्या नवोत्थानातील प्रेरक शक्तींमध्ये त्यांचे प्रमुख नाव आहे. तसेच यंदा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे. ही सार्धशती आपल्याला जनजातीय बांधवांची गुलामगिरी आणि शोषणातून आणि स्वदेशाची विदेशी वर्चस्वातून मुक्ती, अस्तित्व आणि आपल्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी तसेच स्वधर्माचेही रक्षण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या उलगुलानच्या प्रेरणेची आठवण करून देईल, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
  भारताला जगात महत्त्व प्राप्स होत असताना, त्याला खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. जागतिक शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा दावा करणारे देश त्यांच्या सुरक्षा आणि स्वार्याचा प्रश्न निर्माण होताच नितीमत्तेपासून दुरावतात, ही बाब गंभीर आहे. असे देश बेकायदेशीर किंवा हिंसक मार्गानी इतर देशांवर हल्ला करण्यात किंवा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या त्यांच्या सरकारांना उलथून टाकण्याची कारस्थाने रचतात, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.
   देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणा‌ऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वागण्याला ‘अराजकतेचे व्याकरण’ (‘Grammar of Anarchy’) असे म्हटलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवरील दगडफेकीच्या घटना आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हे त्याच व्याकरणाचे उदाहरण आहे. अशा घटना घडू न देणे, पडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण आणणे, दंगेखोरांना तत्काळ शिक्षा करणे हे प्रशासनाचे काम आहे. पण ते पोहोचेपर्यंत समाजालाच स्वतःच्या व प्रियजनांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागते. त्यामुळे समाजानेही सदैव पूर्णपणे सजग, सतर्क राहण्याची आणि या वाईट प्रवृत्तींना, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे, याकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button