‘प्रेमभंग’ तथा ‘ब्रेकअप’ केला म्हणजे आत्महत्येस ‘प्रवृत्त’ केले असे सिद्ध होत नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्कादायक निकाल
प्रेमात पडतांना मानसिक परिपक्वता ठेवा
नवी दिल्ली दि-१३, सर्वोच्च न्यायालयाने आज ब्रेकअप होऊन नैराश्यापोटी आत्महत्या केलेल्या तरूणीच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. देशातील प्रेमाचा ‘ब्रेकअप’ तथा प्रेमभंग होऊन नैराश्य किंवा वैफल्यग्रस्त अवस्थेमुळे आत्महत्या केल्यामुळे दाखल असलेल्या हजारो गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये या निर्णयाचा दूरगामी परिणाम तथा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी साठी आलेल्या एका प्रकरणात एका अविवाहित जोडप्यामध्ये असलेल्या प्रेमाच्या संबंधांमध्ये काही कारणास्तव कटूता निर्माण होऊन दुरावा निर्माण झाल्यानंतर त्या मुलाने सदरील मुलीला ‘मी काही कारणास्तव आता तुझ्याशी लग्न करू शकणार नाही,आपले नाते आता संपुष्टात आलेलं आहे’ असे तोंडी म्हटलेलं होतं. मात्र या दाव्यानुसार त्या तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जबाबदार ठरवून दोषी ठरवले जाऊ शकत नाही.असा मोठा धक्कादायक व ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
दरम्यान ,ब्रेकअप तथा प्रेमभंग झाल्यामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तरूणीच्या वडिलांनी पोलिसात केली होती.तसेच ही बाब त्या मुलीने आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा सांगितलेली होती. असे असताना दुसऱ्या दिवशी त्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली होती. मात्र तिच्याकडे कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट, पोलीस तपासात सापडली गेली नव्हती. तसेच तिच्या मोबाईलमध्ये किंवा तिच्याजवळ असणाऱ्या इतर कोणत्याही वस्तूंमध्ये सदरील मुलाने त्या मुलीला मानसिक किंवा शारीरिक छळ केल्याचा तथा त्रास दिल्याचा पुरावा सापडलेला नाही.
त्या मुलाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात केवळ काही वैचारिक मतभेदांमुळे दुरावा निर्माण झालेला होता. त्याचा परिणाम त्यांच्या रिलेशनशिप वर होऊन त्यांचा प्रेमभंग तथा ब्रेकअप झालेला होता. मात्र ती मुलगी मानसिकरिता अपरिपक्व असल्यामुळे तिला हा धक्का बसलेला असू शकतो. आमच्यात कोणत्याही प्रकारची हाणामारी झालेली नव्हती. तसेच बदनामी करण्याची धमकी सुद्धा दिली नव्हती. तसेच त्या मुलीने मरून जावे किंवा आत्महत्या करावी असेही मी कधीच म्हटलेलं नाही,असा दावा त्या मुलाने न्यायालयात केल्याने न्यायाधीशांनी यावर ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे.
सरन्यायाधीश काय म्हणाले ?
या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ऐतिहासिक निकाल देताना म्हटलेलं आहे की, या प्रकरणातील तरूणी सज्ञान व सुशिक्षित आहे. परंतु ती प्रेमसंबंधांसारख्या नाजूक विषयात मानसिकरित्या अपरीपक्व असू शकते. प्रेम करणे हा गुन्हा अजिबात नाही.मात्र प्रेमात पडण्याआधी आपण त्या गोष्टीसाठी मानसिकरित्या सक्षम आहोत की नाही, आणि भविष्यात प्रेमभंग तथा ब्रेकअप झाल्यास त्याचे होणारे परिणाम याचाही आधी दूरगामी सखोल विचार करणे आजच्या पिढीला अत्यावश्यक आहे.
प्रेमात पडणे आणि नंतर प्रेमभंग तथा ‘ब्रेकअप’ होणे या अशा घटना नेहमी सर्वदूर होतच असतात. ही एक सामान्य बाब झालेली आहे.त्यामुळे ब्रेकअप किंवा प्रेमभंग झाल्यामुळेच त्या तरुणीने आत्महत्या केली हा तरूणीच्या वकिलांचा दावा न्यायाधीशांनी फेटाळून लावला. तसेच त्या तरूणामुळेच आत्महत्या केल्याचा कोणताही सक्षम पुरावा न सापडल्यामुळे न्यायालयाने त्या तरुणाला निर्दोष मुक्त केलेले आहे.