जळगाव मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंकडून भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी फिक्स ?
मुंबई दि:१ एप्रिल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दोन वेळा उमेदवारीची यादी जाहीर करून सुद्धा जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. आज जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण ? याबाबत चर्चा करण्यासाठी काल मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी जळगाव मतदारसंघातील उमेदवारीसाठी कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्या नावांसह भाजपचे खासदार उन्मेष पाटील, उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, करण पवार यांचीही नावे चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी सुद्धा ठाकरे यांची शनिवारी रात्री भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या बैठकीत भाजपच्या पदाधिकारी असलेल्या दोन जणांच्या नावावर चर्चा झाली. त्यातील एक नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपमध्ये असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार, भाजप विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या दोघांच्या नावावर चर्चा झाली. या बैठकीत पारोळा येथील भाजपचे करण पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील तर दुसरीकडे भाजपचे करण पवार या दोघांची नावे जळगाव लोकसभेसाठी आघाडीवर आहे. परंतु, बैठकीत करण पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.करण पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता आता ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.