‘भिडू’ शब्दाचा वापर करताना जॅकी श्रॉफची परवानगी लागेल, जॅकी श्रॉफची उच्च न्यायालयात याचिका दाखल
'भिडू' शब्दाचा कोणी वापर केल्यास 'कॉपीराईट' ?
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने फर्म, सोशल मीडिया चॅनेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ॲप्स तसेच जीआयएफ बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मला त्याच्या संमतीशिवाय त्याचे नाव, जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा तसेच भिडू या त्यांच्या विशिष्ट नावांचे त्याच्या स्वामित्व हक्काचे संरक्षण मागितले आहे, आणि म्हटलेलं आहे की, कोणत्याही प्रकारच्या टेलिव्हिजन कार्यक्रम, ओटीटी,युट्यूब आणि इतर कोणत्याही सोशल मिडिया व्यासपीठावर त्याच्या संमती,आणि अधिकृत परवानगीशिवाय त्यांच्याशी संबंधित खास गुणधर्म असलेले हे शब्द ,उच्चार वापरले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी न्यायालयाने माझ्या स्वामीत्व हक्काचा आदर करून असा शब्दप्रयोग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.
नंदग्राम गोधाम वाटरपार्क अंजाळे या.यावल
काही घटनांमध्ये, त्यांच्या प्रतिमा वापरून आक्षेपार्ह मीम्स बनवले गेले आहेत आणि त्यांच्या आवाजाचाही अशाच हेतूंसाठी गैरवापर केला गेला आहे. त्यांचा आवाज, प्रतिमा किंवा त्यांच्या इतर कोणत्याही विशेष कलेचे,अभिनयाचे गुणधर्म वापरण्यापासून रोखण्यासाठी अभिनेता जॅकी श्रॉफ दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.
याप्रकरणी सुनावणी आज झालेल्या सुनावणीत अधिवक्ता प्रवीण आनंद यांनी जॅकी श्रॉफच्या बाजूने उच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. वकिल आनंद यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, श्रॉफ हे विडंबन किंवा व्यंगचित्र थांबवू इच्छित नाही, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यापार आणि बदनामीकारक आणि विकृत वापराविरूद्ध उच्च न्यायालयाचा आदेश हवा आहे.
अभिनेता श्रॉफने तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MEITY) त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे बेकायदेशीरपणे उल्लंघन करणाऱ्या सर्व लिंक्स आणि वेबसाइट्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.त्याने गुगलच्या मालकीची Tenor आणि दुसरी GIF बनवणारी कंपनी Giphy तसेच AI प्लॅटफॉर्मला या प्रकरणात प्रतिवादी बनवलेले आहे.
श्रॉफ यांनी असा युक्तिवाद केला की व्यावसायिक हेतूसाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्याही अभिनयाच्या कलेच्या वैशिष्ट्याचा त्याच्या स्पष्ट परवानगीशिवाय गैरवापर करणे केवळ प्रसिद्धीच्या अधिकारांच्या पारंपारिक संकल्पनेच्या आधारावरच नव्हे तर अधिक विशेषतः कलंकित करण्याच्या आधारावर देखील प्रतिबंधित केले जाऊ शकते. जेव्हा या कंपन्या जॅकी श्रॉफच्या संमतीशिवाय त्यांच्या प्रतिमेचा, वैशिष्ट्यपूर्ण नावांचा, शब्दप्रयोगांचा वापर करतात तेव्हा हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे होते आणि वरील कंपन्यांच्या या अहितकारक हेतूने जॅकी श्रॉफची प्रतिमा खराब होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धी अधिकारांचे उल्लंघन करण्यापासून मोठ्या प्रमाणावर अशा व्यक्तींना ,कंपन्यांना वरील शब्दप्रयोगांचा वापर प्रतिबंधित करणारा अंतरिम आदेश काढला पाहिजे अशी मागणी जॅकी श्रॉफ यांनी उच्च न्यायालयात केलेला आहे. उद्या या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.