भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकास मोठी लाच घेताना अटक, ACB च्या मोठ्या कारवाईने खळबळ
भुसावळ दि-22/11/2024, ऐन विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातून मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय 39) यांनी दि.19/11/2024 रोजी त्यांचेसोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता. सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 22/11/2024 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50000 ची मागणी करून तडजोड अंती 30000 रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.
याबाबत आज दि-.22/11/2024 रोजी यातील दुसरा आरोप किरण माधव सुर्यवंशी, वय 37,धंदा – मजुरी, रा. हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यास 30000 रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या ठिकाणी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सदरील कार्यवाही ही श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक मो.नं. 9371957391 यांचे मार्गदर्शनाखाली,श्री योगेश ठाकूर
पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव मो.न. 9702433131 यांच्या अचूक नियोजन व पाठपुराव्यामुळे सापळा रचून तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि जळगांव, बाळू मराठे,राकेश दुसाने यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.
याबाबत लासलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
मोबा.क्रं. 9702433131
टोल फ्रि क्रं. 1064