जळगावराजकीय

भुसावळ शहरातील CCTV कॅमेऱ्यांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर,आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश

वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन

जळगाव दि.15 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि भुसावळचे आ.संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत. त्यापैकी ३१९ कॅमेरे बाजारपेठ, तर १२३ कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवण्याचा प्रस्ताव आहे.
    अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, ३६० अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण हे नवीन कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य असेल. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहायकारी ठरणार असल्याची माहिती भुसावळचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.
    भुसावळ शहरातील कॅमेऱ्यांसाठी जागा
शहर पोलिस ठाणे हद्द
: हंबर्डीकर चौक, ओकारेश्वर मंदिर,महाराणा प्रताप चौक, न्यायालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस वसाहत, सेंट अलॉयसेस हायस्कूल, पंचमुखी हनुमान मंदिर, वाल्मीक नगर, कुंभारवाडा, मरिमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल, भोई नगर, स्वामी विहार दत्त नगर, काटेचा कॉलेज, काटेचा स्कूल, पालिका परिसर, सेंट्रल रेल्वे स्कूल, नारखेडे विद्यालय, राहूल नगर, ताप्ती क्लब, रेल्वेन नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर.
बाजारपेठ पोलिस ठाणे हद्द : खडका चौफुली , रजा टॉवर,बसस्थानक, नाहाटा चौक, शिवाजी नगर चौक, वांजोळा रोड, मातृभूमी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, स्टेशन चौकी, पांडुरंग टॉकीज, एसबीआय शाखा, वाल्मीक नगर चौक, मोटुमल चौक, दीनदयाल नगर, आनंद नगर (एसबीआय), सिंधी कॉलनी गेट, पुंडलिक बन्हाटे शाळा जामनेर रोड, श्रद्धा नगर चौक, डीवायएसपी कार्यालय, पंधरा बंगला बुद्ध विहार इत्यादी महत्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत.
   भुसावळ हे शहर मिश्र लोकवस्तीचे शहर आहे.शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून व्यक्तिशः पाठपुरावा सुरू होता.त्याला आता यश आले आहे.भुसावळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिला सुरक्षा,पोलिसांचा गुन्हे तपास, गुन्हे प्रकटीकरण,गुन्हे प्रतिबंध तसेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इत्यादीमध्ये या सीसीटीव्ही प्रकल्पाचा हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दिलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031
Back to top button