महाराष्ट्रमुंबईराजकीय

एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना,भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद, वि.स. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महानिकाल

मुंबई दि-10, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अवघ्या देशाच लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र सुनावणी निकाल अखेर समोर येत आहे. सुरुवातीला शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार मलाच असल्याचे सांगत नार्वेकर यांनी निकाल दिला आहे‌.
शिवसेनेची 1999 सालची घटनाचं वैध : नार्वेकर
2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.
पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार : नार्वेकर
10व्या शेड्युलनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे. पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार आहे. 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही म्हणून तेव्हाची घटनादुरुस्ती चूक आहे. असेही नार्वेकर म्हणाले.
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या : नार्वेकर
खरी शिवसेना कोणती यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले की, “शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत. 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली आहे. घटनेच्या 10व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button