नाशिक परिक्षेत्रात निवडणुकीत रोख रक्कमेचा बेकायदेशीर वापर होत असल्यास ती माहिती ‘या’ नंबरवर पाठवा
पैशांच्या गैरवापराचे फोटो, व्हिडिओ पाठवा
मुंबई दि-२१ मार्च, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहिल्यादेवी नगर, धुळे, नंदुरबार , जळगाव या जिल्ह्यांमध्ये रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
नागरिक दूरध्वनी, व्हॉटसअॅप अथवा ईमेलद्वारे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा माहिती देऊ शकतात.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, 2024 ची प्रक्रिया संपूर्ण भारतात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विदर्भ आणि नाशिक प्रदेशात क्षेत्रात रोख रक्कम, मौल्यवान वस्तू इत्यादींचा बेकायदेशीर वापर होत असल्यास त्या संबंधित माहिती/ तक्रारींसाठी नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्ष दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस ( 24×7 ) कार्यरत राहील.
लोकसभा निवडणूक 2024 मधे, नाशिक आणि विदर्भ विभागात, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू यांचा बेकायदेशीर हेतुने वापर होत असेल तर नागरिक पुढिल संपर्क क्रमांक किंवा ईमेलद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात अथवा त्या संबंधित माहिती देऊ शकतात.
टोल फ्री क्रमांक :1800-233-0355
टोल फ्री क्रमांक :1800-233-0356
व्हॉटसअॅप क्रमांक :9403390980 (छायाचित्र, चित्रफीत इत्यादी पाठवण्यासाठी)
ईमेल : Nagpur.addldit.inv@incometax.gov.in